आगामी टी20 विश्वचषकाची (T20 world cup) सुरुवात 2 जूनपासून होणार आहे. त्यापूर्वीच चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. सर्वत्र टी20 विश्वचषकाची चर्चा होताना दिसत आहे. यंदाचा टी20 विश्वचषक अमेरिका (America) आणि वेस्ट इंडीज (West Indies) या दोन देशांमध्ये खेळला जाणार आहे. तत्पूर्वी आपण या बातमीद्वारे जाणून घेऊया यंदाच्या टी20 विश्वचषक विजेत्या संघाला किती मानधन मिळणार?
यंदाच्या टी20 विश्वचषकात जो संघ बाजी मारेल त्या संघाला किती मानधन मिळणार? हे अजून आयसीसीनं (ICC) स्पष्ट केलं नाही. परंतु 2022 च्या टी20 विश्वचषकाचा जर विचार केला, तर शेवटच्या टी20 विश्वचषकात जेवढी रक्कम विजेत्या संघाला मिळाली होती, तेवढीच रक्कम यंदाच्या विश्वचषक विजेत्याला दिली तर त्यांना किती रक्कम मिळणार हे आपण जाणून घेऊया.
2022 च्या विश्वचषकात आयसीसीनं (ICC) एकूण 5.6 दशलक्ष अमेरिकन डाॅलर एवढी रक्कम ठेवली होती. जे भारतीय रुपयांनुसार 46.6 करोड रुपये आहे. शेवटच्या टी20 विश्वचषकात 16 संघ सहभागी झाले होते. परंतु यंदाच्या टी20 विश्वचषकात 20 संघांनी सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे यंदाचा टी20 विश्वचषक रोमांचक पाहायला मिळणार आहे. 2022 च्या टी20 विश्वचषक विजेतेपदाचा मानकरी इंग्लंड संघ ठरला होता. इंग्लंडनं पाकिस्तान संघाला 5 विकेट्सनं धूळ चारत फायनल सामन्यात बाजी मारली.
त्यावेळी इंग्लंड (England) संघाला 13 करोड रुपये रक्कम मिळाली होती. तर फायनलमध्ये पराभूत होणाऱ्या पाकिस्तान (Pakistan) संघाला 6.44 करोड रुपये रक्कम मिळाली होती. तर टाॅप-4 मध्ये असलेल्या भारत (India) आणि न्यूझीलँड (New Zealand) संघाला 3.25 करोड रुपये मानधन मिळाले होते. तसेच सुपर 12 आणि सुपर 8 मध्ये जे संघ पोहोचले होते त्यांनासुद्धा मानधन देण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या-
संदीप लामिछानेचा टी20 विश्वचषक स्वप्न भंगले! अमेरिकन दूतावासाने पून्हा नाकारले संदीपचा व्हिसा
यंदाच्या टी20 विश्वचषकात अनेक विक्रम मोडित निघणार, ‘या’ दिग्गज खेळाडूंवर राहणार नजर
टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्यात ‘किंग कोहली’ अव्वल स्थानी; तर स्ट्राईक रेट बाबतीत जोस बटलर ‘टाॅपर’