---Advertisement---

फ्लोरिडातील पुढील तीनही सामने पावसामुळे वाहून जातील का? भारत विरुद्ध कॅनडा सामना होणार की नाही?

---Advertisement---

टी20 विश्वचषक 2024 मधील साखळी सामने आता संपत आले आहेत. साखळी फेरीतील काही सामने अमेरिकेत तर काही वेस्ट इंडिजमध्ये खेळले गेले. मात्र आता अमेरिकेच्या फ्लोरिडातील हवामानामुळे क्रिकेट चाहत्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. टी20 विश्वचषकात आतापर्यंत 26 लीग सामने खेळले गेले. फ्लोरिडामध्ये तीन लीग सामने खेळले जाणार आहेत, ज्यामध्ये भारत विरुद्ध कॅनडा सामन्याचा देखील समावेश आहे.

भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना शनिवारी 15 जून रोजी फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ मैदानावर खेळला जाईल. फ्लोरिडामध्ये टी20 विश्वचषकाच्या एकूण 4 सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. येथे पहिला सामना 12 जून रोजी श्रीलंका आणि नेपाळ यांच्यात होणार होता, जो पावसामुळे नाणेफेक न होताच रद्द करण्यात आला. येथे अजून तीन सामने खेळायचे आहेत.

मात्र या उर्वरित तीनही सामन्यांना पावसाचा फटका बसू शकतो. येथे 14 जून रोजी अमेरिका विरुद्ध आयर्लंड, 15 जून रोजी भारत विरुद्ध कॅनडा आणि 16 जून रोजी पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड सामना होणार आहे. हे तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होतील.

नुकतेच फ्लोरिडाच्या मियामीमध्ये वादळ आलं होतं. त्यानंतर पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे येथील समस्या वाढत आहेत. मुसळधार पावसानंतर येथील रस्ते पाण्यानं भरलेले दिसत आहेत, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आता उर्वरित तीन सामन्यांपैकी येथे किती सामने पूर्ण होतात हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.

 

टीम इंडिया आधीच सुपर 8 साठी पात्र झाली आहे. अशा परिस्थितीत, फ्लोरिडामध्ये कॅनडाविरुद्ध खेळला जाणारा सामना पावसामुळे रद्द झाला, तरी भारतीय संघाला पात्रतेशी संबंधित कोणतीही अडचण येणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

विश्वचषकातील सामने संपले, आता न्यूयॉर्कच्या तात्पुरत्या स्टेडियमचं काय होणार? अंबानींच्या नावाची चर्चा का?
यशस्वी जयस्वालला प्लेइंग 11 मध्ये न आणता विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर कसं पाठवायचं? मोहम्मद कैफनं सुचवला पर्याय
भारताच्या विजयाचा पाकिस्तानला फायदा! सुपर-8 चं समीकरण बनलं आणखी रोमांचक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---