---Advertisement---

साउथ अफ्रीकेचा श्रीलंकेवर 6 गडी राखून विजय!

On: सोमवार, जून 3, 2024 11:15 PM
south africa
---Advertisement---

आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) चौथा सामना साउथ अफ्रीका (South Africa) विरुद्ध श्रीलंका (Sri Lanka) यांच्यांमध्ये खेळला गेला. (6 मे) रोजी नासाउ काउंटी अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. अफ्रीकेनं श्रीलंकेचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं साउथ अफ्रीकेसमोर 78 धावांचं आव्हान ठेवलं होतं.

श्रीलंकेनं टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जो त्यांच्यासाठी खूप निराशाजनक ठरला. श्रीलंकेचे सलामीवीर संघाला चांगली सुरुवात करुन देऊ शकले नाहीत. श्रीलंकेसाठी यष्टीरक्षक कुसल मेंडिसनं 30 चेंडूत 19 ही सर्वाधिक धावसंख्या केली. अँजेलो मॅथ्यूजनं 16 चेंडूत 16 तर कामिंदू मेंडिसनं 15 चेंडूत 11 धावांच योगदान संघाला दिलं. अफ्रीकेसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज ॲनरिक नॉर्टजेनं 4 बळी घेतले. केशव महाराज, कगिसो रबाडा यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेत संघाच्या विजायात मोलाची भूमिका बजावली.

दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना साउथ अफ्रीकेसाठी साउथ अफ्रीकेसाठी सलामावीर क्विंटन डी कॉकनं 27 चेंडूत 20 सर्वाधिक धावसंख्या केली. हेनरिक क्लासेन 19 धावा, ट्रिस्टन स्टब्स 13, कर्णधार एडन मार्करमनं 12 धावांची खेळी खेळली. नासाउ स्टेडियमवरची खेळपट्टी गोलंदाजांना साथ देत होती. त्यामुळे 78 धावांच आव्हानं गाठणं देखील साउथ अफ्रीकेला सहज सोपं झालं नाही. श्रीलंकेसाठी कर्णधार फिरकीपटू वनिंदू हसरंगानं सर्वाधिक 2 बळी घेतले, परंतु संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

दोन्ही संघांच्या प्लेइंग 11

श्रीलंका- पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), कामिंदू मेंडिस, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दासून शनाका, वनिंदू हसरंगा (कर्णधार), महेश थीक्षना, मथीशा पाथिराना, नुवान तुषारा

दक्षिण अफ्रीका- क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅन्सन, केशव महाराज, कगिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, ओटनील बार्टमन

महत्त्वाच्या बातम्या-

साउथ अफ्रीकेच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंका फुस्स! अफ्रीकेसमोर अवघ्या 78 धावांचं आव्हान
श्रीलंकेनं जिंकला टाॅस; प्रथम फलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
मॅथ्यू हेडनची प्लेइंग इलेव्हन, रोहितला सलामीवीरातून काढून टाकले, म्हणाले-…तर कोहलीही संघाबाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---