आयसीसी टी20 विश्वचषक 2024 (ICC T20 World Cup) सुरु झाला. टी20 विश्वचषकाचा पहिला सामना (2 जून) रोजी कॅनडा विरुद्ध अमेरिका यांच्यामध्ये खेळला गेला. त्यामध्ये अमेरिकने उत्कृष्टरित्या विजयाला गवसणी घातली. तत्पूर्वी भारतीय संघ टी20 विश्वचषकातील पहिला सामना (5 जून) रोजी आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. तर दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध (9 जून) रोजी खेळणार आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान प्रत्येकवेळी चुरशीची लढत पाहायला मिळते. शेवटच्या टी20 विश्वचषकात जेव्हा भारत पाकिस्तान आमनेसामने आले होते, त्यावेळी विराट कोहलीच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारतीय संघानं पाकिस्तानला धुळ चारली होती. यंदाच्या टी20 विश्वचषकात भारत पाकिस्तान आमनेसामने येण्यापूर्वी भारताचा माजी खेळाडू सुरेश रैना भारतीय संघाच समर्थन करत म्हणाला, ‘पाकिस्तानविरुद्ध सामन्यात आम्ही आमचं सर्वस्व देऊ पण त्यांचा पराभव करु.”
सुरेश रैना म्हणाला, “आम्ही पाकिस्तानविरुद्ध खूप सामने खेळलो आहे. युवराज सिंग, आरपी सिंह, राहुल द्रविड आम्ही सर्वांनी पाकिस्तानविरुद्ध बरेच सामने खेळले आहेत. जेव्हा आपण आपल्या देशाकडून खेळतो, तेव्हा आपण आपले सर्वस्व देतो. मी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. आम्ही एकत्र खूप सामने खेळलो. क्रिकेटमधून जरी निवृत्त झालो असलो, तरी हृदयातून अजून निवृत्ती घेतली नाही. जेव्हा आम्ही भारताचा तिरंगा पाहतो त्यावेळी वाटतं की, आम्ही आमचं सर्वस्व देऊ पण पाकिस्तानकडून पराभव पत्करणार नाही.”
टी20 विश्वचषकाच्या इतिहासात भारत-पाकिस्तान 7 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये भारतीय संघाचं वर्चस्व राहिलं आहे. भारतीय संघानं 6 विजय मिळवले आहेत. भारताने 2007च्या टी20 विश्वचषकात पाकिस्तानला 2 वेळा पराभूत केलं होतं. त्यानंतर 2012, 2014, 2016 आणि 2022 मध्ये भारतानं पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. पाकिस्तान संघानं भारतीय संघाला फक्त एकदाच पराभूत केलं आहे. भारताचा 2021 साली 10 विकेट्सनं निराशाजनक पराभव झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
केकेआरला चॅम्पियन बनवणाऱ्या अय्यरचं झालं लग्न! सोशल मीडियावर फोटो व्हायरल
स्टीव्ह स्मिथ 35 वर्षांचा झाला, चाहत्यांनी स्टार फलंदाजाचे केले अभिनंदन!
अमेरिका-कॅनडाचा क्रिकेट इतिहास आहे 180 वर्ष जुना! ‘या’ वर्षी खेळला गेला होता पहिला सामना