भारतातील क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चाहत्यांना आता टी20 विश्वचषकातील भारताचे सामने डीडी स्पोर्ट्स (DD Sports) चॅनलवर पाहता येणार आहेत.
प्रसार भारतीनं सोमवारी जाहीर केलं की, ते सध्या सुरू असलेला टी20 विश्वचषकातील भारताचे सामने तसेच आगामी पॅरिस ऑलिम्पिक आणि विम्बल्डन स्पर्धा डीडी स्पोर्ट्स चॅनलवर प्रसारित करेल. प्रसार भारतीचे सीईओ गौरव द्विवेदी यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना ही घोषणा केली. यावेळी प्रसार भारतीनं टी20 विश्वचषकासाठी खास ‘जज्बा’ हे गीतही लाँच केलं. याशिवाय दूरदर्शनवर 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान पॅरिस ऑलिम्पिक आणि 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत पॅरिस पॅरालिम्पिकचं थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
टीम इंडिया 6 ते 14 जुलै दरम्यान झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. डीडी स्पोर्ट्सवर या मालिकेचं देखील प्रसारण होणार आहे. टी20 विश्वचषकानंतर होणाऱ्या या दौऱ्यावर पाच टी20 सामने खेळवले जातील. याशिवाय, 27 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान श्रीलंकेत भारताची मर्यादित षटकांची मालिका देखील ‘डीडी स्पोर्ट्स’वर प्रसारित केली जाईल. दूरदर्शन फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनच्या फायनलचंही प्रसारण करेल. प्रसार भारती आपल्या स्पोर्ट्स चॅनेलवर विविध क्रीडा लीग आणि स्पर्धा दाखवण्यासाठी विविध क्रीडा संस्था आणि एजन्सींशी चर्चा करत आहे.
2 ते 29 जून दरम्यान अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जात असलेल्या टी20 विश्वचषक स्पर्धेत 55 सामने खेळले जाणार आहेत. या स्पर्धेत प्रथमच 20 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडशी होणार आहे. त्यानंतर 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येतील. हे दोन्ही सामने न्यूयॉर्कमध्ये खेळले जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
न्यूयॉर्कमध्ये मस्तीच्या मूडमध्ये दिसला ‘हिटमॅन’! इंस्टाग्रामवर शेअर केले मजेशीर फोटो
अफगाणिस्तानची टी20 विश्वचषकाला धडाकेबाज सुरुवात! पहिल्याच सामन्यात मिळवला शानदार विजय
आयर्लंडला हलक्यात घेणं परवडणारं नाही, टीम इंडियासाठी ‘हे’ 5 खेळाडू ठरू शकतात धोकादायक