टी20 विश्वचषक 2024 हळूहळू संपण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या स्पर्धेत सुपर-8 सामने खेळवले जात आहेत. विश्वचषक स्पर्धेत एकूण 20 संघांनी भाग घेतला होता, परंतु साखळी फेरी संपल्यानंतर ट्रॉफीसाठी फक्त 8 संघ उरले आहेत. या 8 संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली असून यामध्ये अव्वल 4 संघ सेमी फायनल मध्ये खेळतील. तर मग जाणून घेऊया दोन्ही गटातील सर्व संघांची स्थिती काय आहे आणि कोणते संघ उपांत्य फेरी गाठण्याच्या जवळ आहेत.
ग्रुप-1 मध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश संघ आहेत. दुसरीकडे, गट-2 मध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि अमेरिका हे संघ आहेत. आतापर्यंत ग्रुप-1 मध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर, भारत दुसऱ्या क्रमांकावर, तर अनुक्रमे तिसऱ्या आणि चाैथ्या स्थानी अफगाणिस्तान बांग्लादेश आहे. तर ग्रुप-2 मध्ये दक्षिण आफ्रिका पहिल्या, वेस्ट इंडिज दुसऱ्या, इंग्लंड तिसऱ्या आणि अमेरिका चौथ्या स्थानावर आहे.
आतापर्यंत सर्व संघांनी गट-1 मध्ये 1-1 सामना खेळला असून त्यात भारत आणि ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे. सध्या या गटातील सर्व संघांना उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची संधी आहे. सर्व संघांना एकूण 3-3 सामने खेळायचे आहेत. आता गट-१ मधून कोणते दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र, 1-1 अशा विजयासह भारत आणि ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीचे प्रबळ दावेदार दिसत आहेत.
आत्तापर्यंत सर्व संघांनी गट-2 मध्ये 2-2 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये फक्त दक्षिण आफ्रिकेने दोन्ही सामने जिंकले आहेत. बाकी इंग्लंड आणि वेस्ट इंडिजने 1-1 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर अमेरिकेने दोन्ही सामने गमावले आहेत. दक्षिण आफ्रिका सेमी फायनलला पोहोचणार हे जवळपास निश्चित दिसत आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये दुसऱ्या स्थानासाठी टक्कर आहे. वेस्ट इंडिजला आपला शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचा आहे, तर इंग्लंड संघ आपला शेवटचा सामना अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. जर दोन्ही संघांनी आपापले शेवटचे सामने जिंकले तर नेट रनरेट वर दोन्ही संघाचे भवितव्य ठरेल.
महत्तवाच्या बातम्या-
आश्चर्यकारक! 15 ओव्हरमध्ये दिला केवळ 1 षटकार, फलंदाजांसाठी बुमराह घातक
भारत-बांगलादेश सामन्यापूर्वी PM मोदींनी दोन्ही संघांना दिल्या शुभेच्छा
“कर्णधारपद तर सोडा बाबर आझम एकदिवसीय आणि टी20 साठी योग्य नाही” माजी क्रिकेटरने लगावला टोला