आयपीएल 2024 चा अंतिम सामना 26 मे रोजी होणार आहे. त्यानंतर लगेच 2 जून पासून आयसीसी टी20 विश्वचषकाला सुरुवात होईल. यंदाच्या टी20 विश्वचषकाचं आयोजन अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे होणार आहे.
भारतीय संघ आपल्या मोहिमेला 5 जून पासून सुरुवात करेल. टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंड विरुद्ध होणार आहे. तर पुढचा सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूयॉर्क येथे रंगणार आहे. या बातमी द्वारे आपण जाणून घेऊया, टी20 विश्वचषकाचे सामने भारतामध्ये कधी आणि किती वाजता पाहता येणार.
भारत आणि आयर्लंड यांच्यात 5 जून रोजी न्यूयॉर्क येथील नासाउ येथे लढत होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरु होईल. परंतु स्पर्धेतील सर्व सामन्यांची वेळ एकसमान नाही. काही सामने भारतीय वेळेप्रमाणे संध्याकाळी 6 वाजता तर काही सामने रात्री 8 वाजता सुरू होतील. तसेच काही सामने रात्री 12.30 वाजता देखील खेळले जाणार आहेत.
टी20 विश्वचषकाच्या सुपर-8 मधील बहुतेक सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता आणि रात्री 8 वाजता सुरु होतील. उपांत्य सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता खेळला जाईल. तर अंतिम सामना रात्री 7.30 वाजता खेळला जाईल.
टी20 विश्वचषक 2024 चे आयोजन अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे होणार आहे. स्पर्धेतील सामने अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथील 9 मैदानांवर खेळले जातील. स्पर्धेचा पहिला सामना 2 जून रोजी अमेरिका विरुद्ध कॅनडा यांच्यात खेळला जाणार आहे. तर अंतिम सामना 29 जून राेजी बार्बाडोस येथे रंगणार आहे.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय टीम – रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंह, खलिल अहमद, आवेश खान
टी20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघाचं वेळापत्रक
5 जून 2024 – भारत विरुद्ध आयर्लंड, न्यूयॉर्क
9 जून 2024 – भारत विरुद्ध पाकिस्तान. न्यूयॉर्क
12 जून 2024 – भारत विरुद्ध यूएसए, न्यूयॉर्क
15 जून 2024 – भारत विरुद्ध कॅनडा, फ्लोरिडा
महत्त्वाच्या बातम्या –
अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये खेळला जाणारा टी20 विश्वचषक भारतात विनामूल्य कसा पाहता येणार? जाणून घ्या