आयपीएल 2024 च्या हंगामात ऑस्ट्रेलियाचे खेळाडू चांगल्या फाॅर्ममध्ये दिसून आले. ट्रेविस हेडला (Travis Head) हैदराबादनं (SRH) संघात संधी दिल्यापासून त्यानं आयपीएलमध्ये धावांचा पाउस पाडला. तर पॅट कमिन्स (Pat Cummins) हैदराबाद संघाचा कर्णधार होता. कमिन्सनं त्याच्या संघाला फायनलपर्यंत पोहचवलं. परंतु फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघानं हैदराबादचा निराशाजनक पराभव केला. मिचेल स्टार्क आयपीएलच्या सुरुवाती सामन्यात फाॅर्ममध्ये नव्हता. परंतु प्लेऑफच्या सामनयांमध्ये स्टार्कनं गोलंदाजीची धार दाखवली.
ऑस्ट्रेलियाच्या संघात यंदाच्या टी20 विश्वचषकात जॅक फ्रेझर मॅकगर्कसारखा विस्फोटक खेळाडू राखीव म्हणून आहे. परंतु यंदाच्या टी20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग 11 काय असणार? ऑस्ट्रेलियानं मागच्या काही दिवसांपूर्वी टी20 विश्वचषकासाठी 15 खेळाडूंची घोषणा केली. ऑस्ट्रेलिया संघानं कर्णधार म्हणून मिचेल मार्शची निवड केली आहे. तर ऑस्ट्रेलिया संघाचा यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड हा उपकर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. ऑस्ट्रेलिया संघात एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू आहेत. त्यामुळे टी20 विश्वचषकात त्यांची प्लेइंग 11 कशी असेल?
ऑस्ट्रलियाच्या संभाव्य प्लेइंग 11 मध्ये सलामीसाठी डेविड वाॅर्नर आणि ट्रेविस हेड हे विस्फोटक खेळाडू ऑस्ट्रेलियाकडून सलामी देतील. तर मधल्या फळीमध्ये मिचेल मार्श, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, टिम डेविड आणि मॅथ्यू वेड यांच्यासारखे खेळाडू फलंदाजी करताना दिसू शकतात. परंतु आयपीएलच्या सामन्यांमध्ये ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) खास कामगिरी करु शकला नाही.
आयपीएलमध्ये राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाचा भाग असलेला ग्लेन मॅक्सवेलनं आरसीबीच्या संघाला यंदाच्या आयपीएल हंगामात निराश केलं. तर डेविड वाॅर्नरनंसुद्धा (David Warner) आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाकडून खेळताना खास कामगिरी केली नाही. तरीही ऑस्ट्रेलियानं या खेळांडूनवर विश्वास दाखवला आहे. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू एडम झम्पा सामन्यांवरती प्रभाव पाडताना दिसू शकतो.
अशी असू शकते टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग 11
डेविड वॉर्नर, ट्रेविस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, टिम डेविड, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), एडम झम्पा, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवुड.
महत्त्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बहु-फॉरमॅट मालिकेसाठी भारताचा महिला संघ जाहीर
काय सांगता! टी20 विश्वचषक विजेत्याला मिळते एवढी रक्कम, उपविजेता संघही मालामाल
संदीप लामिछानेचा टी20 विश्वचषक स्वप्न भंगले! अमेरिकन दूतावासाने पून्हा नाकारले संदीपचा व्हिसा