आयपीएलच्या हंगामानंतर टी20 विश्वचषक (T20 World Cup) पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. (2 जून) रोजी यंदाच्या टी20 विश्वचषकाला शुभारंभ झाला. परंतु भारतीय संघ (India Team) टी20 विश्वचषकातील पहिला सामना वेळापत्रकानुसार (5 जून) रोजी आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) टी20 आंतरराष्ठ्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचण्याची संधी आहे.
रोहित शर्मानं शेवटच्या टी20 विश्वचषकातदेखील भारतीय संघाचं नेतृत्व केलं होत. त्यावेळी भारताला सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून 10 विकेट्सनं पराभवाचा सामना करावा लागला होता. रोहित शर्माला टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावांचा टप्पा गाठण्याची सुवर्णसंधी आहे. रोहितनं जर 4000 धावांचा टप्पा गाठला तर तो बाबर आझम आणि दिग्गज खेळाडू विराट कोहली यांच्यासोबत 4000 धावांची बरोबरी करु शकतो.
रोहित शर्मानं भारतीय संघासाठी सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यानं भारतासाठी आतापर्यंत 151 टी20 सामने खेळले आहेत. यादरम्यानं रोहितनं 3976 धावा ठोकल्या आहेत. त्यानं यंदाच्या टी20 विश्वचषकात 24 धावा बनवल्या तर तो 4000 धावांचा टप्पा पूर्ण करणारा दुसरा भारतीय खेळाडू बनेल. चाहत्यांना आशा आहे की, रोहित शर्मा (5 जून) रोजी आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात हा विक्रम करेल.
टी20 आंतरारष्ट्रीय सामन्यात आतापर्यंत 4000 धावांचा टप्पा गाठणारे फक्त दोन खेळाडू आहेत. त्यामध्ये पहिल्या स्थानी भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली आहे. तर दुसऱ्या स्थानी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आहे. कोहलीनं 117 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 4037 धावा ठोकल्या आहेत. त्यामध्ये कोहलीची सर्वाधिक धावसंख्या नाबाद 122 आहे. बाबर आझमनं 119 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 4023 धावांचा टप्पा गाठला आहे. रोहितलादेखील 24 धावा बनवून या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
राखीव खेळाडू- शुबमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी ! भारतीय संघ टी20 वर्ल्डकप खेळत असतानाच दिग्गज खेळाडूचा क्रिकेटला रामराम
महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन
बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यानंतर राहुल द्रविडने व्यक्त केली नाराजी, खेळाडूंना दिला महत्त्वाचा सल्ला!