आयसीसी टी20 विश्वचषकातील (T20 World Cup) चौथा सामना साउथ अफ्रीका (South Africa) विरुद्ध श्रीलंका (Sri Lanka) यांच्यामध्ये खेळला जात आहे. नासाउ काउंटी अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगला आहे. अफ्रीकेच्या गोलंदाजांनी श्रीलंकेवर जोरदार मारा केला. श्रीलंकेचा एकही फलंदाज 20 धावांच्यावर धावा करु शकला नाही. श्रीलंकेनं अफ्रीकेसमोर अवघ्या 78 धावांच आव्हान ठेवलं आहे.
श्रीलंकेनं टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जो त्यांच्यासाठी उपयोगी ठरला नाही. श्रीलंकेच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली नाही. मधल्या फळीतदेखील श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाला सातत्य टिकवून ठेवता आलं नाही. साउथ अफ्रीकेच्या माऱ्यापुढे श्रीलंका संघ गार झाला.
श्रीलंकेसाठी यष्टीरक्षक कुसल मेंडिसनं 30 चेंडूत 19 ही सर्वाधिक धावसंख्या केली तर अँजेलो मॅथ्यूजनं 16 चेंडूत 16 धावा केल्या. कामिंदू मेंडिसनं 15 चेंडूत 11 धावांच योगदान संघाला दिलं. परंतु श्रीलंकेचा अन्य एकही खेळाडू दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. श्रीलंका संघ 19.1 षटकात सर्वबाद 77 धावाच करु शकला.
साउथ अफ्रीकेसाठी ॲनरिक नॉर्टजेनं 4 विकेट्स घेत श्रीलंका संघाची कंबर मोडली. तर केशव महाराज, कगिसो रबाडा यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेत संघाला मोलाचं यागदान दिलं.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
श्रीलंका- पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), कामिंदू मेंडिस, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दासून शनाका, वनिंदू हसरंगा (कर्णधार), महेश थीक्षना, मथीशा पाथिराना, नुवान तुषारा
दक्षिण अफ्रीका- क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅन्सन, केशव महाराज, कगिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, ओटनील बार्टमन
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंकेनं जिंकला टाॅस; प्रथम फलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
मॅथ्यू हेडनची प्लेइंग इलेव्हन, रोहितला सलामीवीरातून काढून टाकले, म्हणाले-…तर कोहलीही संघाबाहेर
केदार जाधवने एमएस धोनीच्या शैलीत घेतली क्रिकेट मधून निवृत्ती! इंस्टारग्रामवर शेअर केला व्हिडिओ