---Advertisement---

टी20 विश्वचषकात ‘हा’ खेळाडू करणार सर्वाधिक धावा, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजानं दिली प्रतिक्रिया

On: मंगळवार, जून 4, 2024 3:12 PM
virat kohli and rohit sharma
---Advertisement---

आयसीसी टी20 विश्वचषकाला (ICC T20 World Cup) 2 जूनपासून सुरुवात झाली. परंतु भारतीय संघ त्यांचा पहिला सामना वेळापत्रकानुसार (5 जून) रोजी आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. भारत विरुद्ध आयर्लंड हा सामना नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथनं भविष्यवाणी केली आहे की, यंदाच्या टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा कोण करणार?

स्टीव्ह स्मिथला (Steve Smith) वाटत आहे की, यंदाच्या टी20 विश्वचषकात भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) सर्वाधिक धावा करेल. कोहली चांगल्या फाॅर्ममध्ये आहे. त्यानं आयपीएल 2024 मध्ये ऑरेंज कॅप (Orange Cap) देखील पटकावली होती. त्याची आयपीएलमधील कामगिरी सर्वोत्कृष्ट राहिली आहे.

स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) म्हणाला, “मला वाटत आहे की, यंदाच्या टी20 विश्वचषकात विराट कोहली (Virat Kohli) हा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असेल. त्यानं आयपीएलमध्ये देखील आक्रमक फलंदाजी केली होती. भारतासाठीही तो धावांचा पाउस पाडेल.” कोहलीनं आयपीएल 2024च्या हंगामात 15 सामन्यांमध्ये 741 धावा बनवल्या होत्या. त्यामध्ये 1 शतकासह 5 अर्धशतकांचा सामावेश होता.

टी20 विश्वचषकाच्या इतिहासात विराट कोहलीनं (Virat Kohli) 27 सामन्यात 1141 सर्वाधिक धावा बनवल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 81.50 राहिली आहे. तर बाद फेरीच्या सामन्यात कोहलीची सरासरी 144 राहिली आहे. त्यानं यादरम्यान 14 अर्धशतक ठोकले आहेत. विराट कोहलीनंतर भारतीय संघासाठी कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) 39 सामन्यात 963 धावा बनवल्या आहेत. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बांगलादेशचा फिरकीपटू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) आहे. त्यानं 36 सामन्यात 47 बळी घेतले आहेत.

टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

राखीव खेळाडू- शुबमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान

महत्त्वाच्या बातम्या-

लोकसभा निवडणूक निकालातही आरसीबी फॅन्सची हवा! सोशल मीडियावर कमेंट्स व्हायरल
टी20 विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघ कोणता? जाणून घ्या कोणते संघ अजूनही ट्रॉफीपासून वंचित!
हार्दिक पांड्या दमदार पुनरागमनासाठी सज्ज, ‘हा’ व्हिडीओ पाहिल्यानंतर विरोधी गोलंदाजांचा थरकाप उडेल!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---