टी20 विश्वचषकाची (T20 World Cup) सुरुवात (2 जून) रोजी झाली. टी20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात अमेरिकेनं कॅनडाला 7 विकेट्सनं पराभूत केलं. तत्पूर्वी भारतीय संघ त्यांचा टी20 विश्वचषकातील पहिला सामना येत्या 5 जून रोजी खेळणार आहे. भारतीय संघाची धुरा रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हातात आहे. परंतु भारतीय संघात दोन यष्टीरक्षक आहेत. त्यामुळे संघात नेमकं स्थानं कोणाला मिळणार रिषभ पंतला (Rishabh Pant) की संजू सॅमसनला? (Sanju Samson) यावर भारताचे माजी खेळाडू सुनील गावसकरांनी (Sunil Gavaskar) त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
सुनील गावसकरांनी भारतीय संघाच्या यष्टीरक्षकासाठी रिषभ पंतची निवड केली आहे. सुनील गावसकर म्हणाले, “मला वाटते की जर तुम्ही यष्टीरक्षक बघून निवड कराल तर संजू सॅमसनपेक्ष्या रिषभ पंत चांगला यष्टीरक्षक आहे. आपण इथं फलंदाजीची चर्चा करत नाही. जर फलंदाजीवर चर्चा केली तर शेवटच्या काही सामन्यात रिषभ पंतनंदेखील चांगली फलंदाजी केली आहे. संजू सॅमसननंदेखील आयपीएलमध्ये चांगली सुरुवात केली होती. त्यानं अनेक चेंडू मैदानाच्या बाहेर मारले होते, परंतु माझ्या मते रिषभ पंत चांगल्या फाॅर्ममध्ये आहे.”
(1 जून) रोजी भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या सराव सराव सामन्यात भारतानं बाजी मारली. रिषभ पंतन (Rishabh Pant) बांगलादेशविरुद्धच्या साराव सामन्यात 32 चेंडूत 53 धावांची आक्रमक खेळी खेळली. त्यामध्ये त्यानं 4 चौकारांसह 4 उत्तुंग षटकार लगावले. यादरम्यानं त्याचं स्ट्राईक रेट 165.62 होत. खूप दिवसांतर पंत भारतीय संघात पुनरागमन करत आहे. त्यामुळे भारतीय संघाला त्याच्याकडून उत्कृष्ट योगदानाची अपेक्षा असेल. कारण पंतन आयपीएलमध्ये देखील उत्कृष्ट फलंदाजी केली आहे.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
राखीव खेळाडू- शुबमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यानंतर राहुल द्रविडने व्यक्त केली नाराजी, खेळाडूंना दिला महत्त्वाचा सल्ला!
टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील 3 रोमांचक सुपर ओव्हर्स! न्यूझीलंडचा दोनदा झालाय पराभव
रियान परागने दिली विश्वचषकाबद्दल तिखट प्रतिक्रिया! “टी20 विश्वचषक पाहण्यात कोणताही रस नाही! पण शेवटी…”