आयसीसी टी20 विश्वचषकाला (ICC T20 World cup) सुरुवात झाली आहे. यंदाचा टी20 विश्वचषक वेस्ट इंडीज (West Indies) आणि अमेरिका (America) या दोन देशात खेळला जात आहेत. 2 जूनपासून टी20 विश्वचषकाचा शुभारंभ झाला आहे. भारतीय संघदेखील यंदाच्या टी20 विश्वचषकातील पहिला सामना खेळण्यास सज्ज आहे. 5 जून रोजी भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
तत्पूर्वी भारतीय संघाचे माजी खेळाडू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर नेहमीच लक्ष्य ठेवून असतात. यावेळी भारतीय संघाच्या पहिल्या सामन्यापूर्वी गावसकरांनी त्यांची प्लेइंग 11 निवडली आहे. प्लेइंग 11 निवडण्यापूर्वी गावसकर म्हणाले, “मला प्लेइंग 11 निवडण्यात अजिबात रस नाही. कारण प्रत्येकवेळी कोणाचातरी आवडचा खेळाडू असतो, त्याला संघात स्थान मिळत नाही. परंतु आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात मी प्रयत्न करतो की, भारतीय़ संघाची प्लेइंग 11 कशी असली पाहिजे?”
पुढे बोलताना गावसकर म्हणाले, “माझ्या मते कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीनं (Virat Kohli) भारतासाठी सलामी दिली पाहिजे. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर यशस्वी जयस्वालनं फलंदाजीला आलं पाहिजे, चौथ्या स्थानी सुर्यकुमार यादवनं तर पाचव्या स्थानी रिषभ पंतन फलंदाजी केली पाहिजे. 6व्या स्थानावर हार्दिक पांड्या, 7व्या स्थानी रवींद्र जडेजा, 8व्या स्थानी शिवम दुबे, 9व्या स्थानी कुलदीप यादव, 10व्या स्थानी जसप्रीत बुमराह आणि 11व्या स्थानी मोहम्मद सिराज.”
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
राखीव खेळाडू- शुबमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान
महत्त्वाच्या बातम्या-
हे दोन संघ टी20 विश्वचषकात टीम इंडियासाठी ‘घातक’ अद्याप, एकही सामना जिंकण्यात अयशस्वी!
या 5 दिग्गज खेळाडूंचा असू शकतो हा अखेरचा टी20 विश्वचषक, संघात पुन्हा संधी मिळणार नाही
टी20 विश्वचषकात ‘हा’ खेळाडू करणार सर्वाधिक धावा, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजानं दिली प्रतिक्रिया