टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2024ला 2 जूनपासून सुरुवात झाली. आज (6 मे) रोजी साउथ अफ्रीका (South Africa) विरुद्ध श्रीलंका (Sri Lanka) यांच्यामध्ये नासाउ काउंटी अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. श्रीलंकेनं टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
श्रीलंका- पाथुम निसांका, कुसल मेंडिस(यष्टीरक्षक), कामिंदू मेंडिस, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा(कर्णधार), महेश थीक्षना, मथीशा पाथिराना, नुवान तुषारा
दक्षिण अफ्रीका- क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅन्सन, केशव महाराज, कगिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, ओटनील बार्टमन
साउथ अफ्रीकेची धुरा एडन मार्करमच्या हाती आहे. तर श्रीलंकेच्या कर्णधारपदी फिरकीपटू वनिंदू हसरंगा आहे. दोन्ही संघामध्ये आज चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचं झालं, तर टी20 विश्वचषकाच्या इतिहासात दोन्ही संघ 4 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यावेळी 3 सामन्यात साउथ अफ्रीकेनं बाजी मारली आहे. तर श्रीलंका संघानं केवळ एकच सामना जिंकला आहे.
श्रीलंकेनं 2014 साली टी20 विश्वचषकावर प्रथमच नाव कोरल होतं. तर श्रीलंका संघ 2009 आणि 2012 मध्ये उपविजेता राहिला आहे. साउथ अफ्रीकेला अजून टी20 विश्वचषक जिंकता आला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
केदार जाधवने एमएस धोनीच्या शैलीत घेतली क्रिकेट मधून निवृत्ती! इंस्टारग्रामवर शेअर केला व्हिडिओ
मराठमोळ्या केदार जाधवची पाहा कशी राहिली आंतरराष्ट्रीय कारकीर्द!
न्यूयॉर्कमध्ये श्रीलंकन संघ हैराण! कर्णधार हसरंगाने मांडली व्यथा