---Advertisement---

पाकिस्तानला पाणी पाजणाऱ्या सौरभ नेत्रावळकरचा मराठमोळा अंदाज! सलील कुलकर्णींनी शेअर केला सुरेल आवाजाचा व्हिडिओ

On: शुक्रवार, जून 7, 2024 1:41 PM
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2024 च्या 11व्या सामन्यात अमेरिकेनं पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवत मोठा उलटफेर केला. या सामन्याचा हिरो राहिला मराठमोळा सौरभ नेत्रावळकर! सौरभनं आधी 4 षटकांत केवळ 18 धावा देऊन 2 विकेट घेतल्या. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये 18 धावांचा बचाव करत त्यानं अमेरिकेला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

सौरभ नेत्रावळकर मूळचा मुंबईचा आहे. तो 2010 मध्ये भारताकडून अंडर 19 विश्वचषक खेळला होता. मात्र नंतर वरिष्ठ संघात संधी न मिळाल्यानं तो अमेरिकेत गेला. तेथे त्यानं 2018 मध्ये अमेरिकेसाठी पदार्पण केलं. तेव्हापासून तो अमेरिकेच्या संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, सौरभ व्यवसायानं सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्यानं मुंबईतील विद्यापीठातून शिक्षण घेतलं असून तो सध्या ‘ओरॅकल’ या सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत आहे. याशिवाय सौरभला गाण्याची आवड असून त्याचा गळाही खूप गोड आहे. टी20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध सौरभच्या शानदार कामगिरीनंतर प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णी यांनी त्याच्या मराठी गाण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला, जो काही वेळातच व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये सौरभ ‘रे क्षणा थांब ना…’ हे मराठी गाणं गाताना दिसतोय. तसेच तो गाण्यासोबत गिटारही वाजवतोय. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.

 

डावखुरा मध्यमगती गोलंदाज सौरभ नेत्रावळकरचा जन्म 1991 मध्ये मुंबईत झाला. त्यानं 22 डिसेंबर 2013 रोजी मुंबईसाठी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं. तर 27 फेब्रुवारी 2014 रोजी त्यानं लिस्ट-ए क्रिकेटमध्ये मुंबईसाठी पदार्पण केलं. त्यानंतर तो मुंबईसोबत विजय हजारे ट्रॉफीमध्येही खेळला. मात्र चांगल्या संधीसाठी तो अमेरिकेत गेला आणि तेव्हापासून तो अमेरिकेचं प्रतिनिधित्व करत आहे. तो अमेरिकन संघाचा कर्णधारही राहिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

कोण आहे सौरभ नेत्रावळकर? सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला चारली धूळ, लिंकडीन प्रोफाईलचा स्क्रिन शॅाट व्हायरल
साहेबांच्या खेळात भारतीयांची मक्तेदारी! टी20 विश्वचषकात दुसऱ्या देशाकडून खेळणारे भारतीय वंशाचे क्रिकेटपटू
न्यूयॉर्कपासून बांग्लादेशपर्यंत! पाकिस्तानच्या पराभवाचा आनंद जगभरात साजरा; VIDEO व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---