टी20 विश्वचषक 2024 चे यजमान अमेरिकेनं स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. मोनांक पटेलकडे संघाचं नेतृत्व असून भारतातून अमेरिकेत स्थायिक झालेला क्रिकेटपटू उन्मुक्त चंदला संघात संधी मिळालेली नाही. तर न्यूझीलंडसाठी विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणाऱ्या कोरी अँडरसनचा संघात समावेश करण्यात आला आहे.
अमेरिकेनं मोनांक पटेलला कर्णधार बनवलं असून ॲरॉन जेम्सला उपकर्णधार बनवण्यात आलंय. पाकिस्तानच्या शायान जहांगीरनंही संघात पुनरागमन केलं आहे. मात्र, गजानंद सिंग आणि उस्मान रफिकसारख्या मोठी नावांना स्थान मिळालेलं नाही. 2015 मध्ये न्यूझीलंडकडून एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना खेळलेल्या कोरी अँडरसनचा संघात समावेश करण्यात आलाय. कोरीच्या आगमनानं अमेरिकन संघाला बळ मिळालं आहे.
याशिवाय भारताचा अंडर 19 स्टार सौरभ नेत्रालवकर याला संघात स्थान मिळालं आहे. त्यानं 24 टी20 सामन्यात 24 विकेट घेतल्या आहेत. त्यानं अमेरिकेकडून एकदिवसीय सामन्यात 73 विकेट घेतल्या आहेत. अमेरिकेसाठी आनंदाची बातमी म्हणजे, संघाचा वेगवान गोलंदाज अली खान तंदुरुस्त झाला आहे. कॅनडाविरुद्धच्या मालिकेत अलीला दुखापत झाली होती. कॅनडाविरुद्धच्या याच मालिकेतून पदार्पण करणारा ऑफस्पिनर मिलिंद कुमारचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
टी२० विश्वचषकाच्या ‘अ’ गटात अमेरिका भारत, पाकिस्तान आणि कुवेतसोबत आहे. संघ 1 जून रोजी कॅनडाविरुद्ध पहिला सामना खेळेल. हा सामना डल्लास येथे होणार आहे. अमेरिकेचा संघ 12 जूनला न्यूयॉर्कमध्ये भारताशी भिडणार आहे.
२०२४ टी२० विश्वचषकासाठी अमेरिकेचा संघ – मोनांक पटेल (कर्णधार), ॲरॉन जोन्स (उपकर्णधार), अँड्रिज गॉस, कोरी अँडरसन, अली खान, हरमीत सिंग, जेसी सिंग, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोशतुश केनजिगे, सौरभ नेत्रालवकर, शेडली व्हॅन शाल्कविक, स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर
राखीव खेळाडू – गजानंद सिंग, जुआनोय ड्रायस्डेल, यासिर मोहम्मद
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडू फॉर्मात परतले, तर भारतीय खेळाडू पूर्णपणे फ्लॉप!
कोलकाताविरुद्ध ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून का खेळला रोहित शर्मा? कारण आलं समोर
विश्वचषकाच्या संघातून वगळल्यानंतर रोहित शर्मानं घेतली रिंकू सिंहची भेट, सोशल मीडियावर चर्चांना उधाण