आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) दुसरा सामना वेस्ट इंडीज विरुद्ध पापुआ न्यू गिनी या दोन संघांमध्ये प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना येथे हा सामना खेळला जात आहे. वेस्ट इंडीजच्या भेदक माऱ्यापुढे पापुआ न्यू गिनी संघ मात्र 136 धावा बनवू शकला. वेस्ट इंडीजचा (West Indies) संघ या आव्हानाचा कशा पद्धतीनं पाठलाग करेल हे पाहणंदेखील महत्त्वाचं ठरणार आहे.
वेस्ट इंडीज कर्णधार रोवमन पाॅवेलनं (Rovman Powell) टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पापुआ न्यू गिनी संघाची सुरुवाच खूपच खराब झाली. सलामीवीर जोडी संघाला चांगली सुरुवात करुन देऊ शकली नाही. सलामीवीर कर्णधार असाद वालाला अल्झारी जोसेफनं 21 धावांवरती तंबूत पाठवले. सेसे बाऊनं पापुआ न्यू गिनीसाठी 43 चेंडूत 50 सर्वाधिक धावसंख्या केली. तर किपलीन डोरिगोनं 18 चेंडूत 27 धावांची खेळी खेळली.
पापुआ न्यू गिनी संघानं 8 गडी गमावून 136 धावसंख्या गाठली. वेस्ट इंडीजसाठी अनुभवी गोलंदाज आंद्रे रसेल आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले. तर अकेल होसेन, रोमरियो शेफर्ड, गुडाकेश मोती यांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवत संघाला मोलाचं योगदान दिलं.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
वेस्ट इंडीज- ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, आंद्रे रसेल, रोमॅरियो शेफर्ड, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, अकेल होसेन
पापुआ न्यू गिनी– टोनी उरा, सेसे बाऊ, असाद वाला (कर्णधार), लेगा सियाका, हिरी हिरी, चार्ल्स अमिनी, चाड सोपर, किपलिन डोरिगा (यष्टीरक्षक), आले नाओ, काबुआ मोरिया, जाॅन कारिको
महत्त्वाच्या बातम्या-
निकोलस पूरनला ‘या’ दिग्गज खेळाडूचा विक्रम मोडीत काढण्याची सुवर्णसंधी!
वेस्ट इंडीजनं जिंकला टॉस, प्रथम गोलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
अमेरिकन सुरक्षा यंत्रणा सज्ज! विराट कोहलीची सुरक्षा पाहून व्हालं थक्क