---Advertisement---

वेस्ट इंडिज विरुद्ध पापुआ न्यू गिनी सामना, चर्चा मात्र हार्दिक पांड्याची! नेमकं काय घडलं जाणून घ्या

Hardik Pandya
---Advertisement---

अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जात असलेल्या टी20 विश्वचषकाला धडाक्यात सुरुवात झाली आहे. विश्वचषकाचा पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळला गेला. या सामन्यात अमेरिकेनं बाजी मारली. यानंतर दुसरा सामना वेस्ट इंडिज आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात झाला. मात्र हा सामना या दोन संघांऐवजी टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यामुळे चर्चेत राहिला. आता तुम्ही विचार करत असाल की, हार्दिक पांड्या आणि या सामन्याचा काय संबंध? चला तर मग, या बातमीद्वारे जाणून घेऊया.

वेस्ट इंडिजनं पापुआ न्यू गिनीविरुद्धचा सामना 5 गडी राखून जिंकला. या सामन्यात वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज रोस्टन चेसनं 27 चेंडूत 42 धावांची खेळी केली. तर ब्रँडन किंगनं 29 चेंडूत 34 धावांचं योगदान दिलं. याशिवाय अष्टपैलू आंद्रे रसेलनं 3 षटकांत 19 धावा देत 2 बळी घेतले. हे तीन खेळाडू वेस्ट इंडिजच्या विजयाचे हिरो ठरले. पापुआ न्यू गिनीकडून सिसा बुआनं 43 चेंडूत 50 धावांची खेळी केली. संघाकडून असद वालानं शानदार गोलंदाजी करत 4 षटकात 28 धावा देत 2 बळी घेतले. या सामन्यात या सर्व पाच खेळाडूंचा हार्दिक पांड्याशी खास संबंध असल्याचं दिसून आलं!

झालं असं की, वेस्ट इंडिज विरुद्ध पापुआ न्यू गिनी सामन्याचे अधिकृत ब्रॉडकास्टर ‘हॉटस्टार’नं खूप मोठी चूक केली, ज्याची आता सर्वत्र चर्चा होत आहे. ‘हॉटस्टार’नं या सामन्यादरम्यान असं पोस्टर दाखवलं, जे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले. ‘हॉटस्टार’नं दाखवलेल्या पोस्टरमध्ये वरच्या पाच खेळाडूंऐवजी हार्दिक पांड्याचा फोटो दिसत होता! फोटोमध्ये नाव या खेळाडूंचं होतं, मात्र त्यांच्या फोटच्या जागी हार्दिक पांड्याचा फोटो दिसत होता. ‘हॉटस्टार’ची ही चूक सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाली. चाहते या घटनेचा स्क्रिनशॉट काढून शेअर करत आहेत. वेस्ट इंडिज आणि पापुआ न्यू गिनीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या कुठून आला असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. तुम्ही हा फोटो येथे पाहू शकता.

 

महत्त्वाच्या बातम्या – 

झोपडपट्टीत दिवस काढले, प्यायला शुद्ध पाणी नव्हतं; युगांडाचा हा क्रिकेटपटू आता विश्वचषकात आपला जलवा दाखवणार!
नामिबियाच्या रुबेन ट्रम्पेलमननं रचला इतिहास! टी20 विश्वचषकात अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच गोलंदाज
टी20 विश्वचषकात 12 वर्षांनंतर सुपर ओव्हरचा थरार! नामिबियाचा ओमानवर रोमहर्षक विजय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---