2024 टी20 विश्वचषकाला येत्या 2 जूनपासून सुरुवात होत आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत या विश्वचषकाचं आयोजन होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आयर्लंडविरुद्ध आपल्या विश्वचषक मोहिमेला सुरुवात करेल. हे दोन संघ 5 जूनला आमनेसामने येणार आहेत. यानंतर टीम इंडिया आपला दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तानचे संघ 9 जूनला एकमेकांशी भिडणार आहेत. उभय संघांमधील हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ स्टेडियमवर खेळला जाईल.
टी20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय चाहत्यांना ‘डिस्नी प्लस हॉटस्टार’वर टी20 विश्वचषक स्पर्धा विनामूल्य पाहता येणार आहे. यासाठी कोणतंही सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही. तसेच तुम्ही ‘स्टार स्पोर्ट्स नेटवर्क’वर विश्वचषकाचं थेट प्रक्षेपण पाहू शकता. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क हे टी20 विश्वचषक 2024 चे अधिकृत प्रसारक आहेत. याशिवाय, ‘डिस्नी प्लस हॉटस्टार’वर तुम्ही या स्पर्धेतील सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग विनामूल्य पाहू शकाल.
अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीनं अलीकडेच टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात हार्दिक पांड्या उपकर्णधाराच्या भूमिकेत आहे. आयपीएल प्लेऑफनंतर भारतीय खेळाडू लगेच विश्वचषकासाठी रवाना होतील. तर विश्वचषकात निवड झालेल्या ज्या खेळाडंचा आयपीएल संघ प्लेऑफमध्ये पोहोचला नाही, असे खेळाडू आधीच वेस्ट इंडिजसाठी रवाना होतील.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय टीम – रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंह, खलिल अहमद, आवेश खान
टी20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघाचं वेळापत्रक
5 जून 2024 – भारत विरुद्ध आयर्लंड, न्यूयॉर्क
9 जून 2024 – भारत विरुद्ध पाकिस्तान. न्यूयॉर्क
12 जून 2024 – भारत विरुद्ध यूएसए, न्यूयॉर्क
15 जून 2024 – भारत विरुद्ध कॅनडा, फ्लोरिडा
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची जर्सी लॉन्च, या लूकमध्ये दिसणार रोहित ब्रिगेड
चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही? ‘बीसीसीआय’नं स्पष्टच सांगितलं