टी20 विश्वचषक अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा आधीच झाली असून आता संघाची जर्सीही लाँच करण्यात आली आहे.
भारतीय संघाची जर्सी जगभरात क्रीडा कपड्यांसाठी प्रसिद्ध ब्रँड असलेल्या ‘आदिदास’ द्वारे तयार केली गेली आहे. ‘आदिदास’नं इंस्टाग्रामवर ग्राफिक्सच्या माध्यमातून भारतीय संघाची जर्सी अधिकृतपणे लाँच केली. रिलीज झालेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा हे भारतीय खेळाडू दिसत आहेत.
2024 टी20 विश्वचषकासाठीच्या जर्सीचा पुढचा भाग निळा ठेवण्यात आला आहे. तर बाह्यांचा रंग केशरी आहे. याशिवाय खांद्यावर 3 पांढरे पट्टे लावण्यात आले आहेत. ड्रीम 11 गेल्या बऱ्याच काळापासून भारतीय क्रिकेट संघाचा टायटल स्पॉन्सर आहे. त्यामुळे जर्सीच्या पुढच्या बाजूला मोठ्या अक्षरात ‘DREAM 11’ असं लिहिलेलं आहे. त्याखाली INDIA छापलं आहे.
टीम इंडियाच्या नव्या जर्सीबाबत चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. नवीन जर्सीचा व्हिडिओ समोर येताच लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये नवीन डिझाइनला ट्रोल करण्यास सुरुवात केली. काहीजण याला मूर्खपणा म्हणत आहेत तर काहीजण म्हणत आहेत की गेल्या विश्वचषकाची जर्सी खूपच सुंदर दिसत होती.
एका चाहत्यानं असंही म्हटलं की, ‘आदिदास’नं भारतीय संघाची प्रशिक्षण आणि मॅच जर्सी एकत्र करून नवीन डिझाइन तयार केलंय. यात नवीन काहीही नाही. काही लोकांनी याला चांगलं म्हटलं असलं तरी बहुतेक लोक याला अतिशय वाईट डिझाइन म्हणत आहेत.
View this post on Instagram
टी20 विश्वचषकासाठी भारतीय टीम संघ – रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
राखीव खेळाडू – शुबमन गिल, रिंकू सिंह, खलिल अहमद, आवेश खान
टी20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघाचं संपूर्ण वेळापत्रक
5 जून 2024 – भारत विरुद्ध आयर्लंड, न्यूयॉर्क
9 जून 2024 – भारत विरुद्ध पाकिस्तान. न्यूयॉर्क
12 जून 2024 – भारत विरुद्ध यूएसए, न्यूयॉर्क
15 जून 2024 – भारत विरुद्ध कॅनडा, फ्लोरिडा
टी20 विश्वचषकात दहशतवादी हल्ल्याची धमकी, पंतप्रधानांनी केला धक्कादायक खुलासा
विश्वचषक संघात निवड झाल्यानंतर सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद, शिवम दुबेला झालं तरी काय?