---Advertisement---

कोण आहे अंशुल कंबोज? हैदराबादविरुद्ध मुंबई इंडियन्सनं दिली पदार्पणाची संधी

---Advertisement---

आयपीएल 2024 च्या 55व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्ससमोर सनरायझर्स हैदराबादचं आव्हान आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

या सामन्यात मुंबई इंडियन्सनं हरियाणाकडून खेळणारा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज याला पदार्पणाची संधी दिली आहे. अंशुलला मुंबईनं आयपीएल 2024 च्या लिलावात त्याच्या मूळ किमतीत म्हणजेच 20 लाख रुपये देऊन विकत घेतलं होतं.

अंशुल हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये हरियाणासाठी अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावतो. गेल्या वर्षीच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये अंशुल कंबोजनं उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यामुळेच मुंबई इंडियन्सनं त्याला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी दिली आहे.

कोण आहे अंशुल कंबोज
अंशुल कंबोजचा जन्म 6 डिसेंबर 2000 रोजी हरियाणातील कर्नाल येथे झाला. त्यानं फेब्रुवारी 2022 मध्ये हरियाणासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. अंशुलनं आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यानं 24 विकेट्स घेतल्या असून फलंदाजी करताना 284 धावा केल्या आहेत. तो पदार्पणापासूनच चांगली कामगिरी करत आहे. अंशुलनं ऑक्टोबर 2022 मध्ये हरियाणासाठी टी20 पदार्पण केलं. तेव्हापासून त्यानं 9 सामन्यांमध्ये 11 बळी घेतले आहेत.

मुंबई इंडियन्समध्ये स्थान कसं मिळालं?
अंशुल कंबोजनं विजय हजारे ट्रॉफीमध्ये हरियाणासाठी चमकदार कामगिरी केली आहे, ज्यामुळे त्याला फार लोकप्रियता मिळाली. गेल्या मोसमात खेळलेल्या 10 सामन्यांत त्यानं 17 विकेट घेतल्या होत्या. या 10 सामन्यांमध्ये त्याचा इकॉनॉमी रेट केवळ 3.58 एवढा होता. त्याची ही कामगिरी मुंबई इंडियन्सला आकर्षित करण्यासाठी पुरेशी ठरली. आयपीएल 2024 च्या लिलावात मुंबई इंडियन्सनं अंशुल कंबोजचा 20 लाख देऊन संघात समावेश केला. अंशुलनं 2023 विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 9 षटकात 34 धावा देऊन 2 बळी घेतले होते. या कामगिरीच्या जोरावर त्यानं हरियाणाला प्रथमच विजय हजारे ट्रॉफी जिंकून दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

वानखेडे स्टेडियमवर हार्दिक पांड्यानं जिंकला टॉस, हैदराबादला फलंदाजीचं आमंत्रण; जाणून घ्या प्लेइंग 11

रमणदीप सिंग बनला ‘सुपरमॅन’, कॅच घेण्यासाठी चक्क 21 मीटर धावला! पाहा आयपीएल 2024 मधील सर्वोत्तम झेल

“जर 9व्या क्रमांकावर फलंदाजी करायची असेल तर खेळूच नको”, हरभजन सिंगचा माहीवर जोरदार हल्लाबोल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---