---Advertisement---

रमणदीप सिंग बनला ‘सुपरमॅन’, कॅच घेण्यासाठी चक्क 21 मीटर धावला! पाहा आयपीएल 2024 मधील सर्वोत्तम झेल

---Advertisement---

आयपीएल 2024 चा 54 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कोलकातानं 98 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयानंतर संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आला आहे.

या सामन्यात केकेआरच्या रमणदीप सिंगनं एक शानदार डायव्हिंग झेल घेतला, जो आता चर्चेचा विषय बनला आहे. चाहते त्याच्या या डायव्हिंग कॅचला आयपीएल 2024 मधील सर्वोत्तम झेल म्हणत आहेत.

रमणदीप सिंगनं रविवारी झालेल्या लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात नेत्रदीपक डाइव्ह करून झेल घेतला. कोलकाताचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनं लखनऊचा सलामीवीर अर्शिन कुलकर्णी याला लेन्थ बॉल टाकला होता. कुलकर्णीनं चेंडू लेग साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू त्याच्या बॅटच्या बाहेरील कडेला लागून ऑफ साईडच्या दिशेनं वर गेला. रमणदीप सिंग त्या भागात क्षेत्ररक्षण करत होता. रमणदीपनं चेंडूवर नजर ठेवली, योग्य वेळी डाइव्ह केलं आणि उत्कृष्ट झेल घेतला. कुलकर्णी 7 चेंडूत 9 धावा करून बाद झाला.

 

या सामन्यात रमणदीप सिंगनं केवळ शानदार झेलच घेतला नाही, तर त्यानं बॅटनं देखील कमाल केली. त्यानं अवघ्या 6 चेंडूत 25 धावा ठोकल्या, ज्यामध्ये 1 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीच्या जोरावर कोलकातानं लखनऊविरुद्ध 235 धावांचा डोंगर रचला.

धावांचा पाठलाग करताना लखनऊची टीम पूर्णपणे अपयशी ठरली. संपूर्ण संघ 16.1 षटकांत अवघ्या 137 धावांवर ऑलआऊट झाला. अशाप्रकारे केकेआरनं या सामन्यात 98 धावांनी मोठा विजय मिळवला. कोलकाताकडून हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले. धावांच्या बाबतीत लखनऊचा हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा पराभव आहे. या विजयासह कोलकाताची टीम गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचली आहे. संघाचे 11 सामन्यांत 8 विजयानंतर 16 गुण आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

कोलकाताची विजयी घौडदौड जारी, लखनऊचा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव

रवींद्र जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईनं पंजाबला घरच्या मैदानावर चारली धूळ; गुणतालिकेत घेतली मोठी झेप

“जर 9व्या क्रमांकावर फलंदाजी करायची असेल तर खेळूच नको”, हरभजन सिंगचा माहीवर जोरदार हल्लाबोल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---