आयपीएल २०२४ च्या ५४व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्ससमोर कोलकाता नाईट रायडर्सचं आव्हान होतं. लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. केकेआरनं लखनऊचा ९८ धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताना २० षटकांत ६ गडी गमावून २३५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, लखनऊचा संघ १६.१ षटकांत १३७ धावा करून ऑलआऊट झाला.
धावांचा पाठलाग करताना लखनऊची सुरुवात खराब झाली. सलामीवीर अर्शिन कुलकर्णी मिळालेल्या संधीचं सोनं करू शकला नाही. तो दुसऱ्या षटकात ९ धावा करून बाद झाला. मिशेल स्टार्कनं त्याची विकेट घेतली. यानंतर कर्णधार राहुल आणि मार्कस स्टॉयनिस यांच्यात ५० धावांची भागीदारी झाली. मात्र ७० च्या स्कोरवर लखनऊची दुसरी विकेट पडली. राहुल २५ धावा करून बाद झाला.
यानंतर लखनऊची मधली फळी ढेपाळली. दीपक हुड्डा ५ आणि निकोलस पूरन १० धावा करून बाद झाला. स्टॉयनिस ३६ धावांचं योगदान देऊन रसेलच्या गोलंदाजीत आऊट झाला. आयुष बदोनीनं १५ धावा केल्या. क्रुणाल पांड्या ५, टर्नर १६ धावा करून तंबूत परतले. केकेआरकडून हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्तीनं ३-३ बळी घेतले. तर आंद्रे रसेलनं २ विकेट घेतल्या.
तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सनं 6 गडी गमावून 235 धावा केल्या. सलामीवीर सुनील नारायणनं 27 चेंडूत अर्धशतक केलं. त्यानं फिल सॉल्टसोबत दुसऱ्या विकेटसाठी 46 चेंडूत 79 धावांची भागीदारी केली. नारायण ३९ चेंडूत ८१ धावा करून बाद झाला. त्यानं आपल्या खेळीत 7 षटकार आणि 6 चौकार मारले.
फिल सॉल्टनं 14 चेंडूत 32 धावा केल्या. तर अंगकृष्ण रघुवंशीनंही 32 धावा केल्या. सरतेशेवटी कर्णधार श्रेयस अय्यरनं 15 चेंडूत 23 आणि रमणदीप सिंगनं 6 चेंडूत 25 धावा केल्या. लखनौकडून नवीन उल हकनं आश्चर्यकारक कामगिरी करत ३ बळी घेतले. रवी बिश्नोई, यश ठाकूर आणि युधवीर सिंग यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला.
दोन्ही संघांच्या प्लेइंग ११
लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बदोनी, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान, यश ठाकूर
इम्पॅक्ट प्लेअर्स – अर्शिन कुलकर्णी, मणिमरण सिद्धार्थ, कृष्णप्पा गौथम, युधवीर सिंग, देवदत्त पडिक्कल
कोलकाता नाईट रायडर्स – फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नारायण, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा
इम्पॅक्ट प्लेअर्स – अनुकुल रॉय, मनीष पांडे, श्रीकर भारत, शेरफेन रदरफोर्ड, वैभव अरोरा
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नईचे 3 सामने बाकी, आता प्लेऑफचं समीकरण काय? टॉप-४ मध्ये स्थान कसं निश्चित होईल? जाणून घ्या
42 वर्षीय धोनीनं सर्वांना टाकलं मागे, बनला आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणारा यष्टिरक्षक
विश्वचषक संघात निवड झाल्यानंतर सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद, शिवम दुबेला झालं तरी काय?