आयपीएल 2024 च्या 55व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्ससमोर सनरायझर्स हैदराबादचं आव्हान आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या – आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. विकेट फ्रेश दिसते. नवीन चेंडूसाठी काहीतरी असू शकतं, त्याचा फायदा घ्यायचा आहे. अंशुल कंभोज पदार्पण करत आहे.
हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स – मयंक अग्रवाल संघात परतला. तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. येथे दव हा मोठा फॅक्टर आहे. चार गेम शिल्लक आहेत, कदाचित त्यापैकी दोन जिंकावे लागतील. मात्र आम्ही इतका पुढचा विचार करत नाही.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स – ईशान किशन (यष्टिरक्षक), रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा
इम्पॅक्ट प्लेअर्स – नेहल वढेरा, शम्स मुलानी, शिवालिक शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, रोमॅरियो शेफर्ड
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टिरक्षक), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॅनसेन, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन
इम्पॅक्ट प्लेअर्स – मयंक मार्कंडे, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, जयदेव उनाडकट, उमरान मलिक
चालू हंगामात मुंबई आणि हैदराबाद दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. हैदराबादनं मागील सामन्यात 277 धावांचा डोंगर रचल्यानंतर मुंबईचा 31 धावांनी पराभव केला होता. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सची टीम प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर आहे. आज घरच्या मैदानावर संघ सन्मान वाचवण्यासाठी खेळायला उतरेल. मुंबईनं 11 पैकी 6 सामने गमावले असून ते पॉइंट्स टेबलमध्ये तळाच्या 10व्या स्थानावर आहे. मुंबईच्या खात्यात फक्त 6 गुण आहेत. गेल्या चार सामन्यांत मुंबईला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
दुसरीकडे, पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबाद संघ आज दोन गुण मिळवून प्लेऑफच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. सनरायझर्सनं आतापर्यंत 10 पैकी 6 सामने जिंकले असून ते टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहेत. हैदराबादचे सध्या 12 गुण आहेत. हैदराबादनं त्यांच्या शेवटच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध एका धावेनं रोमांचक विजय नोंदवला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
रमणदीप सिंग बनला ‘सुपरमॅन’, कॅच घेण्यासाठी चक्क 21 मीटर धावला! पाहा आयपीएल 2024 मधील सर्वोत्तम झेल
“जर 9व्या क्रमांकावर फलंदाजी करायची असेल तर खेळूच नको”, हरभजन सिंगचा माहीवर जोरदार हल्लाबोल
कोलकाताची विजयी घौडदौड जारी, लखनऊचा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव