---Advertisement---

वानखेडे स्टेडियमवर पहिल्यांदाच मॅच पाहायला आला ‘ज्युनियर बुमराह’, सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल

---Advertisement---

सोमवारी (6 मे) वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल 2024 चा 55वा सामना खेळला गेला. सामन्यादरम्यान मैदानावरील विविध घटना कॅमेऱ्यात कैद होत असतात. या सामन्यातही असंच एक दृष्य कैद झालं.

मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचं कुटुंब स्टँडमध्ये बसलेलं दिसलं. बुमराहची पत्नी संजना गणेशन हिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, केवळ संजनाच नाही तर या जोडप्याचा मुलगा अंगद बुमराह देखील हा सामना पाहण्यासाठी मैदानावर पोहोचला होता. संजनाच्या मांडीवर बसलेल्या अंगदचे फोटो सोशल मीडियावर लोक खूप पसंत करत आहेत. संजना या आधीही जसप्रीत बुमराहला सपोर्ट करण्यासाठी मैदानात आली आहे. मात्र यावेळी पहिल्यांदाच अंगदसोबतचे तिचे क्यूट फोटो व्हायरल झाले जे लोकांना खूप आवडले आहेत.

 

आज जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन हिचा वाढदिवस आहे. संजनाचा जन्म 6 मे 1991 रोजी पुण्यात झाला होता. जसप्रीतनं सोशल मीडियावर पोस्ट करत पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर आपलं प्रेम व्यक्त करताना जसप्रीत बुमराह म्हणाला, “त्याचं आणि अंगदचं संजनावर खूप प्रेम आहे. संजनाच्या असण्यानं त्यांचं आयुष्य अधिक समृद्ध होतं.”

जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांचा विवाह 15 मार्च 2021 रोजी झाला होता. सुमारे अडीच वर्षांनंतर त्यांच्या घरी अंगदच्या रुपानं पाळणा हलला. अंगद बुमराहचा जन्म 4 सप्टेंबर 2023 रोजी झाला. जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांनी सोशल मीडियाद्वारे त्याच्या जन्माची बातमी दिली होती. नवीन सदस्याच्या आगमनानं त्यांच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार असल्याचं या जोडप्यानं म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या – 

कोण आहे अंशुल कंबोज? हैदराबादविरुद्ध मुंबई इंडियन्सनं दिली पदार्पणाची संधी

वानखेडे स्टेडियमवर हार्दिक पांड्यानं जिंकला टॉस, हैदराबादला फलंदाजीचं आमंत्रण; जाणून घ्या प्लेइंग 11

“जर 9व्या क्रमांकावर फलंदाजी करायची असेल तर खेळूच नको”, हरभजन सिंगचा माहीवर जोरदार हल्लाबोल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---