7 फेब्रुवारीपासून टी-20 विश्वचषकाचा थरार सुरू होत आहे. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील भारतीय संघाला यावेळेस विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. प्रत्येक संघात एकापेक्षा एक धडाकेबाज फलंदाज असल्याने या स्पर्धेत चौकार-षटकारांचा पाऊस पडणार हे निश्चित आहे. याच पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash chopra) यांनी अशा 3 फलंदाजांची नावे सांगितली आहेत, जे या वर्ल्ड कपमध्ये आपल्या फलंदाजीने खळबळ माजवू शकतात.
आकाश चोप्राच्या मते, अभिषेक शर्मा या वर्ल्ड कपमध्ये आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरेल. तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत त्याने केवळ 14 चेंडूत अर्धशतक ठोकून खळबळ उडवून दिली होती.
दुसरा फलंदाज म्हणून त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडचे (Travis Head) नाव घेतले आहे. हेड हा कोणत्याही गोलंदाजी आक्रमणाच्या चिंधड्या उडवण्यासाठी ओळखला जातो. ऑस्ट्रेलियाची या स्पर्धेतील कामगिरी बऱ्याच अंशी हेडच्या फॉर्मवर अवलंबून असेल.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) हा टी-20 फॉरमॅटमधील सर्वात घातक फलंदाज मानला जातो. तो एकट्या जीवावर सामना फिरवू शकतो, असे चोप्रा यांचे मत आहे.
आकाश चोप्रा यांनी फलंदाजांशिवाय अशा 3 गोलंदाजांचीही नावे सांगितली आहेत, जे या स्पर्धेत आपली जादू दाखवू शकतात. वरुण चक्रवर्तीने गेल्या वर्षभरात त्याने आपल्या फिरकीने सर्वांना प्रभावित केले आहे. बुमराह हा भारतीय गोलंदाजीचा कणा असून तो याही वेळी महत्त्वाची भूमिका बजावेल. तसेच ऑस्ट्रेलिया गोलंदाज ॲडम झम्पा फिरकीला पूरक खेळपट्ट्यांवर झम्पा प्रतिस्पर्ध्यांसाठी कर्दनकाळ ठरू शकतो.






