---Advertisement---

टी-20 वर्ल्ड कप 2026: बांगलादेशचे सामने भारतात कुठे आणि कधी? पाहा संपूर्ण वेळापत्रक

On: बुधवार, जानेवारी 7, 2026 7:23 PM
---Advertisement---

टी-20 वर्ल्ड कप 2026 ची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होणार आहे. भारत आणि श्रीलंका (IND vs SL) संयुक्तपणे या मोठ्या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहेत. मात्र, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच बांगलादेशने भारतात आपले सामने खेळण्यास नकार दिला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) खेळाडूंच्या सुरक्षेचे कारण देत हे पाऊल उचलले असून, त्यांना त्यांचे सर्व सामने श्रीलंकेत खेळायचे आहेत.

सध्याच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार, बांगलादेशचे भारतात होणारे सामने खालीलप्रमाणे आहेत.
7 फेब्रुवारी: पहिला सामना वेस्ट इंडिजविरुद्ध (कोलकाता).
9 फेब्रुवारी: दुसरा सामना इटलीविरुद्ध (कोलकाता).
12 फेब्रुवारी: तिसरा सामना इंग्लंडविरुद्ध (कोलकाता).
17 फेब्रुवारी: लीग स्टेजचा शेवटचा सामना नेपाळविरुद्ध (मुंबई).

आता बांगलादेशच्या या मागणीनंतर आयसीसी (ICC) काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---