भारताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाचा जन्म 22 डिसेंबर, 2001मध्ये दिल्लीच्या घेवरामध्ये जाट कुटुंबात झाला. वडिलांच्या प्रभावामुळे क्रिकेटकडे त्याचा कल लहानपणापासूनच दिसला. तसेच ॲथलेटिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या हर्षितचे वडील प्रदीप राणा हे सीआरपीएफसाठी माजी हॅमर थ्रोअर आणि वेटलिफ्टर होते. त्यांनी हर्षितला सुरूवातीला प्रशिक्षण दिले.
हर्षितने वयाच्या 10व्या वर्षापासून क्रिकेटची पहिली प्रोफेशनल ट्रेनिंग सुरू केली. शालेय जीवनात त्याला श्रवण कुमार हे प्रशिक्षक म्हणून लाभले. त्यांच्यामते तो मैदानात चांगला असला, तरी त्याच्यात शिस्तीची थोडी कमतरता होती. “तो नेहमी त्याच्या मित्रांसोबत फिरत असे, यामुुळे मला वाटले त्याची क्रिकेटची कामगिरी धोक्यात येईल. मात्र त्याने वेळीच सावध होत क्रिकेटकडे लक्ष दिले. त्याच्यातील प्रतिभा पाहून तो नक्की भारतासाठी क्रिकेट खेळणार”, असे त्यांनी म्हटले होते.
हर्षितने कुमार यांचे विधान सत्यात उतरवले. त्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. त्यासाठी त्याने खूप आधीपासूनच क्रिकेटमध्ये लक्ष केंद्रित करण्यासाठी 12वी पर्यंत मोबाईल टाळला.
हर्षितला स्थानिक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करताना त्याला आता दिल्लीच्या संघाचे वेध लागले होते. मात्र पाठीच्या दुखापतीमुळे दिल्लीच्या 14 वर्षांखालील आणि 16 वर्षांखालील संघांमध्ये स्थान मिळवण्यात अपयश. नंतर 2020-21 मध्ये स्ट्रेस फ्रॅक्चर झाले. सुरूवातीला आलेल्या संकटांमुळे हर्षितने माघार घेण्याची ठरवले, मात्र वडिलांच्या म्हणण्यानुसार त्याने प्रयत्न सुरूच ठेवले.
हर्षितने 2022मध्ये दिल्लीकडून प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए मधून पदार्पण केले. त्याचवर्षी त्याच्या आयपीएलचीही सुरूवात झाली, मात्र त्या ऑक्शनमध्ये तो अनसोल्ड राहिला. गुजरातसाठी नेट बॉलर भुमिकेत असताना, नीतीश राणाने कोलकाता नाईट रायडर्सला त्याचे नाव सुचविले आणि तो बदली खेळाडू म्हणून केकेआरशी जोडला गेला.
हर्षितने आयपीएल पदार्पणातच फलंदाजीला आला असता चौकार मारला, तसेच गोलंदाजी करताना दोन चेंडूनंतर विकेटही घेतली. त्याने महत्वाच्या विकेट्स घेत सातत्याने चांगली कामगिरी करत राहिला आणि तो कोलकाताच्या वेगवान गोलंदाजीचा मुख्य भाग बनला. त्याने फलंदाजीतही जोर आजमावला. त्याने 2023च्या दुलीप ट्रॉफीमध्ये 75 चेंडूत शतक केले.
कोलकाताने 2024मध्ये आयपीएलचे विजेतेपद जिंकले. त्यामध्ये हर्षित कोलकातासाठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज. त्याने 19 विकेट्स घेतल्या. त्याचवर्षी त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पणही केले. त्याने 2024च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी पदार्पण केले. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये पहिल्या डावात 3 विकेट्स घेतल्या.
तसेच हर्षितने 2025मध्ये इंग्लडविरुद्ध वनडे-टी20 पदार्पण केले. त्याची वनडेतील सर्वोत्तम कामगिरी सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आली. त्यामध्ये त्याने 39 धावा 4 विकेट्स घेतल्या. टी20च्या पदार्पणातील कामगिरी सर्वोत्तम ठरली. इंग्लंडविरुद्ध 33धावा 3 विकेट्स घेतल्या.
हर्षित भारताच्या विजयी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि एशिया कप 2025चा भाग राहिला. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत हर्षितने त्याचे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक केले.
श्रवण यांनी हर्षितच्या फ्लाईंग किसच्या व्हायरल सेलेब्रेशनबाबतही विधान केले, “ते काही विचित्र नसून त्याचे एक प्रकारचे सेलेब्रेशन आहे.” हर्षितने २०२४च्या आयपीएलमध्ये पहिल्यांदा सेलेब्रेशन केले होते. त्यानंतर त्याने अनेक सामन्यात केले. त्याच्या या सेलेब्रेशनचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला.
हर्षितला भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा लाडका म्हणूनही ओळखले जाते, मात्र एक गोष्ट नक्की ती म्हणजे तो महत्वाच्या विकेट्स घेत भागीदारी तोडण्यात पटाईट आहे. तो नुकत्याच झालेल्या टी२० विश्वचषकातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात दुखापतग्रस्त झाला आहे. यामुळे तो लवकर ठीक होऊन संघात परतावा एवढेच.






