---Advertisement---

मोठी बातमी: पाकिस्तानचा अखेर यू-टर्न, भारतासोबत खेळण्यास तयार! आयसीसी बैठकीनंतर घेतला निर्णय

On: सोमवार, फेब्रुवारी 9, 2026 8:30 PM
---Advertisement---

पाकिस्तान अखेर टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताविरुद्ध खेळण्यास तयार झाला आहे (Icc T20 international world cup 2026). नियोजित वेळापत्रकानुसार, हा सामना 15 फेब्रुवारीला कोलंबो (श्रीलंका) येथे खेळवला जाईल. लाहोरमध्ये झालेल्या बैठकीनंतर पाकिस्तानने हा मोठा निर्णय घेतला आहे. या बैठकीत पाकिस्तान आणि बांगलादेशने आयसीसीसमोर (ICC) काही मागण्या ठेवल्या होत्या, त्यापैकी काही मान्य करण्यात आल्या आहेत.

बांगलादेशचा संघ टी-20 वर्ल्ड कप 2026 मधून बाहेर पडला आहे. त्यामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी बांगलादेशने भरपाई मागितली होती. ICC या मागणीवर सहमत झाले असून, त्या बदल्यात बांगलादेशला 19 वर्षांखालील (U-19) वर्ल्ड कप आणि महिला क्रिकेट वर्ल्ड कपचे यजमानपद दिले जाऊ शकते.

पाकिस्तानने ICC च्या एकूण उत्पन्नातील (Revenue Share) आपला हिस्सा वाढवण्याची मागणी केली आहे. सध्या पाकिस्तानचा हिस्सा 5.75% (सुमारे 34-35 दशलक्ष डॉलर्स) आहे. ICC ने यावर विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. 2012 पासून भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही आंतरराष्ट्रीय मालिका’ झालेली नाही. ही मालिका पुन्हा सुरू करण्याची पाकिस्तानची मागणी ICC ने फेटाळली आहे. “दोन देशांमधील मालिका ठरवणे आमच्या अधिकारात येत नाही,असे ICC ने स्पष्ट केले.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वेळी दोन्ही देशांमध्ये ‘हायब्रिड मॉडेल’वर सहमती झाली होती. त्यानुसार, टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील भारत-पाक सामना तटस्थ ठिकाणी म्हणजेच श्रीलंकेत खेळवला जाईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---