---Advertisement---

विराट कोहलीच्या प्रशिक्षकांनी पाकिस्तानला फटकारलं; भारताविरुद्ध न खेळण्याच्या निर्णयावर केलं मोठं विधान!

On: सोमवार, फेब्रुवारी 2, 2026 7:32 PM
---Advertisement---

टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना होणार नाही, असे चित्र दिसत आहे. पाकिस्तान सरकारने आपली टीम भारतासोबत खेळणार नाही, असे स्पष्ट केले आहे. या निर्णयावर विराट कोहलीचे बालपणाचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा (Virat Kohli’s chilhood coach on PCB decision) यांनी कडक शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

न्यूज एजन्सी ‘ANI’ शी बोलताना राजकुमार शर्मा म्हणाले की, पाकिस्तानचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आणि विचित्र आहे. आधी त्यांनी बांगलादेशच्या भारत दौऱ्यावर न येण्याच्या भूमिकेला पाठिंबा दिला आणि आता स्वतःही तेच करत आहेत. या निर्णयामुळे पाकिस्तानचे आणि तिथल्या क्रिकेट प्रेमींचे मोठे नुकसान होईल. तिथल्या लोकांना आपल्या खेळाडूंना भारताविरुद्ध खेळताना पाहायचे असते.

मला वाटते की, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यावर पुन्हा विचार करेल. राजकुमार शर्मा पुढे म्हणाले की, आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही तुलना उरलेली नाही, कारण भारत क्रिकेटमध्ये खूप पुढे निघून गेला आहे. हा एक राजकीय निर्णय आहे. जर यावर आयसीसीने (ICC) काही कडक कारवाई केली, तर पाकिस्तान बोर्डाला किती मोठा आर्थिक फटका बसेल, याचा त्यांनी विचार करायला हवा.

पाकिस्तानचा टी-20 कर्णधार सलमान आगाने आधीच स्पष्ट केले आहे की, हा खेळाडूंचा निर्णय नाही. सरकार जे सांगेल, त्याचेच पालन पाकिस्तानी खेळाडू करतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---