---Advertisement---

टी-20 विश्वचषक 2026 मध्ये टीम इंडियाचा संघ कसा असेल? ‘या’ खेळाडूंना मिळू शकते मोठी संधी!

On: सोमवार, डिसेंबर 15, 2025 8:49 PM
---Advertisement---

टी-20 विश्वचषक 2026 चे आयोजन भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे करणार आहेत. या आगामी स्पर्धेचे वेळापत्रक (Schedule) जाहीर झाले आहे.

स्पर्धेची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना यूएसए (USA) विरुद्ध खेळेल. टी-20 विश्वचषक 2026 साठी टीम इंडियाच्या संभाव्य संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) भारतीय संघाची कमान सांभाळणार आहे. तर शुबमन गिलला (Shubman gill) उपकर्णधारपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, आणि शिवम दुबे यांनाही भारतीय संघात संधी मिळू शकते. तसेच, संजू सॅमसन, जितेश शर्मा आणि हार्दिक पांड्या यांसारख्या अनुभवी आणि महत्त्वाच्या खेळाडूंनाही स्थान मिळण्याची शक्यता आहे. अक्षर पटेल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर आणि वरुण चक्रवर्ती यांच्यावर फिरकीची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तसेच हर्षित राणा, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग हे वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळू शकतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---