---Advertisement---

ईशान किशन की संजू सॅमसन? टी-20 वर्ल्ड कपमध्ये ओपनिंग कोण करणार, कर्णधार सूर्याने स्पष्टच सांगितलं

On: रविवार, फेब्रुवारी 1, 2026 6:49 PM
---Advertisement---

टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतीय संघासाठी ओपनिंग कोण करणार? या जागेसाठी सध्या संजू सॅमसन (Sanju Samson and Ishaan kishan) आणि ईशान किशन यांच्यात मोठी चढाओढ सुरू आहे. एकीकडे सॅमसनला व्यवस्थापनाचा पाठिंबा आहे, तर दुसरीकडे ईशान किशन धावांचा पाऊस पाडत आहे. विशेष म्हणजे, सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सॅमसनला स्थान देणार नसल्याचे आधीच म्हटले आहे. आता खुद्द कर्णधार सूर्यकुमार यादवने या वादावर मौन सोडले आहे.

कर्णधार सूर्यकुमार यादवने ‘जिओ हॉटस्टार’शी बोलताना सांगितले की, संजू सॅमसन आणि ईशान किशन यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार, याचा निर्णय 7 फेब्रुवारीलाच घेतला जाईल. याच दिवशी भारत अमेरिकेविरुद्ध (USA) आपला पहिला सामना खेळून वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात करणार आहे. 7 फेब्रुवारीला जेव्हा अधिकृत ‘प्लेइंग इलेव्हन’ जाहीर होईल, तेव्हाच ओपनरचे नाव स्पष्ट होईल, असे सूर्याने स्पष्ट केले.

सुमारे दोन वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या ईशानने न्यूझीलंडविरुद्धच्या 4 डावात 53.57 च्या सरासरीने 215 धावा केल्या. यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. तिरुवनंतपुरममधील शेवटच्या सामन्यात त्याने केवळ 43 चेंडूत 103 धावांची झंझावाती खेळी केली होती.

सॅमसनने 2024 मध्ये 5 डावात 3 शतके झळकावली होती, पण त्यानंतर ओपनर म्हणून तो फ्लॉप ठरला आहे. जानेवारी 2025 पासून आतापर्यंत त्याने 11 डावात फलंदाजी केली, पण त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. या 11 डावात त्याने केवळ 134 धावा केल्या, तर न्यूझीलंडविरुद्धच्या 5 डावात तो फक्त 46 धावाच करू शकला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---