मैदानावर खेळणाऱ्या आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला पाहण्यासाठी चाहते स्टेडिअममध्ये गर्दी करतात. काही अतिउत्साही चाहते सुरक्षा घेरा तोडून मैदानावर धावत सुटतानाची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. मात्र, टी20 विश्वचषक 2022मध्येही अशीच एक घटना पुन्हा एकदा घडली. यामध्ये एक मुलगा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याच्या हातात तिरंगा झेंडाही होता. या चाहत्यावर मोठा दंडही लावण्यात आला आहे. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहेत.
नेमकं काय घडलं?
ही घटना झिम्बाब्वे संघाच्या डावाच्या 17व्या षटकादरम्यानची आहे. भारतीय संघाची गोलंदाजी सुरू होती, तेव्हा एक मुलगा तिरंगा झेंडा घेऊन मैदानावर घुसला आणि रोहित शर्मा याच्याशी भेटण्याची आशा व्यक्त केली. मात्र, तो मैदानात घुसताच त्याला सुरक्षारक्षकांनी पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्यांना सतत चकवत रोहितकडे जात होता. तेव्हाच एका सुरक्षारक्षकाने हवेत झेप घेत या चाहत्याला पकडले. यानंतर तो मुलगा रडू लागला. मात्र, रोहित त्या मुलाच्या जवळ गेला आणि त्याच्याशी बोलला. तसेच, त्याने सुरक्षारक्षकाला त्या मुलाला घेऊन जाण्यास सांगितले. यादरम्यान मोहम्मद शमी हादेखील धावत धावत त्याच्या जवळ आला होता. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
Little fan didn't get chance to meet Rohit Sharma… Nice gesture from Captain Rohit he talked with him…#RohitSharma𓃵 #T20worldcup22 #T20WorldCup pic.twitter.com/eQ4Pw6UJt2
— Saurabh (Modi Ka Parivar) 🤍 (@Cricket_Gyaani_) November 6, 2022
Intruder on the ground with an Indiqn flag and looks like @ImRo45 comes up to check on him after security tackles him! #INDvsZIM pic.twitter.com/4soPhPERfB
— Rajdeep Singh Puri (@Rajdeep1494) November 6, 2022
OTHER PLAYERS HAVE FANS 💙… ROHIT SHARMA HAVE DEVOTEES 🧎!! pic.twitter.com/kbDS7ViQgv
— Vishal. (@SPORTYVISHAL) November 6, 2022
A fan invaded the field today to meet Rohit Sharma, he was in tears when he came close to Rohit.
The fan has been fined 6.5 Lakhs INR for invading the field. pic.twitter.com/CmiKIocTHf
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 6, 2022
माध्यमांतील वृत्तांनुसार, सामन्यादरम्यान मैदानात घुसल्याबद्दल या चाहत्यावर 6.5 लाख रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा चाहतावर्ग जगभरात आहे. अशात, त्यांचे चाहते मैदानावर त्यांना भेटण्यासाठी नेहमीच असे पाऊल उचलत असतात. असेच काहीसे, झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यातही पाहायला मिळाले.
सामन्याचा आढावा
भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 5 विकेट्स गमावत 186 धावा करत झिम्बाब्वेला 187 धावांचे आव्हान दिले होते. यावेळी भारताकडून फलंदाजी करताना रोहित शर्माची बॅट पुन्हा शांतच पडली. त्याने 13 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने फक्त 15 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त सूर्यकुमार यादव (61) आणि केएल राहुल (51) यांनी अर्धशतकी खेळी केली. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वे संघाचा डाव 115 धावांवरच संपुष्टात आला आणि भारताने हा सामना 71 धावांनी आपल्या नावावर केला.
भारताचा पुढील सामना
भारतीय संघाचा उपांत्य सामना 10 नोव्हेंबर रोजी ऍडलेड येथे इंग्लंडविरुद्ध होणार आहे. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाचा नवा ‘चाणक्य’ कर्णधार रोहित शर्मा! केलाय धोनीलाही न जमलेला पराक्रम
झिम्बाब्वेविरुद्ध पहिली ओव्हर संपताच ‘स्विंग किंग’ भुवीच्या नावे दोन मोठे विक्रम, बातमी वाचाच