टी20 विश्वचषकात (T20 World Cup) शनिवारपासून (22 ऑक्टोबर)सुपर 12चे सामने सुरू होणार आहेत. यातील पहिला सामना गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि गतउपविजेता न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12.30 ला या सामन्याला सुरूवात होणार आहे, मात्र या सामन्यावर सध्या पावसाचे सावट पसरले आहे.
ऑस्ट्रेलियातील वातावरण पाहिले तर तेथे मागील काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. यामुळे हा सामना होणारा की नाही याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे, कारण या सामन्याच्या दिवशीही तेथील हवामान खात्याने पावसाची शक्यता दर्शवली आहे. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड हे दोन संघ समोरासमोर आले की 2021चा अंतिम सामना आठवतो. यामध्ये न्यूझीलंड 8 विकेट्सने पराभूत झाला होता. या दोन संघामध्ये झालेला हा शेवटचा टी20 सामना होता. त्यानंतर यांच्यात एकही सामना खेळला गेला नाही. यामुळे त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी न्यूझीलंडकडे आहे. ऑस्ट्रेलियाही घरच्या मैदानावर खेळत आहे, तर ते ही विजयाने सुरूवात करण्याचा प्रयत्न करतील.
न्यूझीलंड संघ मागील काही आयसीसी स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करत आहे. मग तो कसोटी, वनडे वा टी20 सामना असो त्यांनी 2019पासून नेहमी शेवटची फेरी गाठली आहे. तसेच कर्णधार केन विलियमसन याने 2021च्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक केले होते. तर ऑस्ट्रेलियाकडे टिम डेविड आहे. हे दोघे एकमेंकांना टक्कर देऊ शकतात. गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याने गेल्या वर्षभरात टी20 क्रिकेटमध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 32 डावात 6.20 च्या इकॉनॉमी रेटने 23 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्यापुढे महिश तीक्ष्कणा असून त्याने 40 डावात 24 विकेट्स घेतल्या आहेत.
हा सामना जेथे होणार आहे, त्या स्टेडियमच्या खेळपट्टीवर शुक्रवारी कव्हर होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच कर्णधार ऍरॉन फिंच याला त्याचे निरीक्षण करता आले नाही. ऑस्ट्रेलियन ब्युरो ऑफ मेटिऑरॉलॉजीने सामन्याच्या दिवशी दुपारी आणि संध्याकाळी पावसाची शक्यता सांगितली आहे. तसेच सिडनीमध्ये फार काळ पाऊस पडत नाही.
ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड टी20 सामन्यांत आमने-सामने
सामने- 18
ऑस्ट्रेलिया विजयी- 10
न्यूझीलंड विजयी- 4
रद्द- 3
बरोबरी – 1
न्यूझीलंड संघ: डेवॉन कॉनवे (विकेटकीपर), फिन ऍलन, मार्टिन गप्टिल, केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मायकेल ब्रेसवेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, ऍडम मिल्ने, इश सोधी, डॅरिल मिशेल.
ऑस्ट्रेलिया संघ: ऍरॉन फिंच (कर्णधार), डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ऍडम झम्पा, जोश हेझलवूड, स्टिव्ह स्मिथ, केन रिचर्डसन, ऍश्टन अगर , कॅमेरून ग्रीन.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अक्षर अन् अश्विनमध्ये कुणाचं पारडं जड? अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन
एमसीए निवडणुकीत तेंडुलकर-गावसकरांसह 8 क्रिकेटपटू मतदानापासून वंचित! धक्कादायक कारण आले समोर