नुकतेच पाकिस्तानने आगामी टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup)संघ जाहीर केला. असे असताना पाकिस्तान संघामध्ये दुखापतीचे सत्र काही संपत नाहीये. आशिया चषक (Asia Cup) 2022च्या हंगामात पाकिस्तान संघ अंतिम सामन्यात पराभूत झाला. या स्पर्धेपूर्वीच त्यांचा स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी दुखापतीमुळे बाहेर झाला होता. तर त्याच्याबरोबर मोहम्मद वसीमही दुखापतग्रस्त झाला. तर ही स्पर्धा संपल्यावर त्यांचे आणखी दोन स्फोटक फलंदाज दुखापतग्रस्त झाले आहेत.
फखर जमान आणि मोहम्मद रिझवान हे जखमी असल्याचे वृत्त पुढे येत आहे. हे दोघेही गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहेत. यातील जमानला बोर्डने आराम दिला असून त्याला टी20 विश्वचषकासाठीच्या राखीव खेळाडूंमध्ये जागा दिली आहे. तर रिजवानच्या मेडिकल रिपोर्टनुसार तो कराची येथे खेळल्या जाणाऱ्या काही सामन्यांमध्ये सहभाग घेणार नाही. त्याच्याजागी मोहम्मद हॅरीसला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मोहम्मद वसीम फिट होऊन संघात परतला आहे.
जमानच्या दुखापतीबाबर पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (पीसीबी) प्रेस रिलीज केले. त्यानुसार जमान शुक्रवारी लंडनला रवाना होणार आहे. त्याला अंतिम सामन्यात क्षेत्ररक्षण करताना गुडघ्याची दुखापत झाली होती.
या प्रेस रिलीजमध्ये शाहीनच्या दुखापतीबाबतही माहिती दिली आहे. पीसीबीने सांगितले की, शाहीन हा लवकरच फिट होत असून तो टी20 विश्वचषकात खेळेल याची शक्यता दर्शवली जात आहे. तसेच पाकिस्तानने जाहीर केलेल्या 15 मुख्य सदस्यांमध्ये त्याचा समावेश आहे. तर त्याला इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या सात टी20 सामन्यासाठी संघात घेतले नाही कारण तो सध्या पूर्णपणे फिट नाही.
आठव्या टी20 विश्वचषकात पाकिस्तान बाबर आझम याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. तर उपकर्णधार शादाब खान आहे. तसेच शाह मसूद याला संघात निवडले आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात पदार्पणदेखील केलेले नाही.
टी20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ-
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, हैदर अली, हॅरिस रउफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, उस्मान कादिर.
राखीव खेळाडू-
फखर जमान, मोहम्मद हरीस, शाहनवाज दहानी.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023मध्ये मुंबईच होणार चॅम्पियन? मागील नऊ वर्षाचा योगायोग येणार जुळून
नऊ वर्षात मुंबई इंडियन्सने 4 गुरु बदलले, पण दुनिया हलवायला संघाचा ‘सेनापती’ एकच
सामन्यात खेळाडूंशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानच्या आसिफ अलीने चाहत्याशीही घातली हुज्जत, व्हिडिओ होतोयं व्हायरल