टी20 विश्वचषक 2022मध्ये (T20 World Cup) भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लड असे हायव्होल्टेजचे सामने खेळले जाणार आहेत. हे सामने कधी एकदा सुरू होतात याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याच्या फलंदाजीकडे सगळ्यांचे लक्ष आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियन भुमीवर कशी कामगिरी करेल याबाबतही चाहते उत्सुक आहेत. त्याआधीच सूर्यकुमारचा प्रसिद्ध शॉट पाहायला मिळाला आहे.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याचा शॉट सीपी रिझवान (CP Rizwan) याच्या बॅटमधून निघाला आहे. ज्याने नामिबियाच्या विरुद्ध 29 चेंडूत नाबाद 43 धावा केल्या आहेत. यूएई टी20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे, मात्र त्यांनी हा सामना 7 धावांनी जिंकला आहे.
युनायटेड अरब अमिरातीचा कर्णधार सीपी रिझवान याची फलंदाजी पाहून सूर्यकुमारची आठवण आली. यूएईने पहिल्या फेरीतील शेवटचा साखळी सामना नामिबियाच्या विरुद्ध खेळताना प्रथम फलंदाजी केली. त्यांनी 20 षटकांत 3 विकेट्स गमावत 148 धावा केल्या. प्रत्युत्तरात नामिबिया 20 षटकांत 8 विकेट्स गमावत 141 धावासंख्येपर्यंत मजल मारू शकला.
यूएईने 148 धावसंख्या उभारली असली तरी सुरूवातीला ते अवघड वाटत होते, मात्र रिझवान याने तुफानी फलंदाजी केली. त्याने त्याच्या 43 धावा या विलक्षण खेळीत 3 चौकार आणि एक षटकार खेचला. यामध्ये त्याने मारलेला एक चौकार तर हुबेहुब सुर्यकुमारच्या स्टाईलमध्ये मारला होता.
यूएईचा डाव सुरू असताना जॅन फ्रायलिंक याने 14वे षटक टाकले. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रिझवानने चौकार मारला. त्याने कवर्सच्यावरून हा शॉट मारला. तसेच सूर्यकुमार हा नेहमी षटकार मारताना अशाच पद्धतीन शॉट खेळतो. त्याच्या या शॉटचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
यूएई पहिल्या फेरीतच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर राहिली, तर नामिबिया तिसऱ्या स्थानावर. दोन्ही संघ टी20 विश्वचषकातून बाहेर झाले आहेत. तसेच नामिबियाच्या पराभवाने नेदरलॅंड्स सुपर 12मध्ये पोहोचला. त्यांचा भारत, पाकिस्तान संघ असलेल्या गट 2मध्ये समावेश आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोहम्मद शमीच्या पुनरागमनाने ‘या’ खेळाडूची जागा धोक्यात, वाचा पाकिस्तानविरुद्ध भारताची गोलंदाजी कशी असेल?
जेव्हा दसऱ्याच्या दिवशी कुंबळे आणि श्रीनाथने भारताला करून दिले होते विजयाचे सीमोल्लंघन