येत्या काहीच दिवसांमध्ये टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील भारतीय क्रिकेट संघाचे सामने सुरू होतील. या स्पर्धेमध्ये उतरणाऱ्या भारतीय संघाची फलंदाजी फळी खूपच तगडी असल्याचे दिसत आहे. सूर्यकुमार यादव मागील काही काळापासून दमदार फॉर्ममध्ये आहे. त्याची फलंदाजी पाहून माजी भारतीय खेळाडू संजय बांगर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी असे म्हटले की, ऑस्ट्रेलियात सूर्यकुमारला काहीच अडचण येणार नाही.
संजय बांगर यांचे सूर्यकुमारविषयी भाष्य
स्टार स्पोर्ट्सच्या एका शोवर बोलताना संजय बांगर (Sanjay Bangar) म्हणाले की, “सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा त्याच्या पहिल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. तसेच, पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला भेट देणाऱ्या कोणत्याही खेळाडूला विकेटचा वेग आणि उसळी याची सवय होणे, हे महत्त्वाचे घटक आहेत. मला वाटत नाही की, त्याला फिरकीपटू किंवा गोलंदाजांचा सामना करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. हे चांगले संकेत आहेत की, तो भारतीय फलंदाजी क्रमात महत्त्वपूर्ण राहिला आहे. विशेषत: मधल्या फळीत. त्यामुळे सूर्यकुमारला धावा करण्यासाठी हा आत्मविश्वास विश्वचषकात चांगल्या प्रकारे वापरणे महत्त्वाचे आहे.”
सूर्यकुमार यादवच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर त्याने यामध्ये एक अर्धशतक साकारले होते. याव्यतिरिक्त त्याने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यात आलेल्या सराव सामन्यातही अर्धशतक झळकावण्याची कामगिरी केली होती. घरच्या मैदानांवरही त्याने दमदार फलंदाजी करून संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. तो सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. तसेच, भारतीय संघाला निश्चितच त्याच्या फॉर्मचा फायदा होईल.
यापूर्वी भारतीय माजी कर्णधार कपिल देव यांनी म्हटले होते की, “सूर्यकुमार संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याच्याशिवाय संघ नाहीये. कुणीही विचार केला नव्हता की, तो अशाप्रकारे खेळेल. मात्र, आता तो संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे.”
भारत विरुद्ध पाकिस्तान
भारतीय क्रिकेट संघाचा टी20 विश्वचषक 2022मधील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध 23 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये होणार आहे. दोन्ही संघांनी या सामन्यासाठी जोरदार तयारी केली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भारताला कुणाचीही ऐकण्याची गरज नाही’, क्रीडा मंत्र्यांचे पाकिस्तानच्या धमकीला सडेतोड प्रत्युत्तर
विकेटकीपरऐवजी ऑलराऊडंर! दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाला टी20 विश्वचषक संघात करावे लागले ‘हे’ बदल