---Advertisement---

बांगलादेशला बसणार मोठा दणका! आयसीसी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; टी-20 वर्ल्ड कप वादाला नवे वळण

On: शुक्रवार, जानेवारी 16, 2026 6:05 PM
---Advertisement---

टी-20 वर्ल्ड कपवरून सुरू असलेल्या वादात बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) आता स्वतःच अडचणीत येताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे काही वरिष्ठ अधिकारी येत्या दोन-तीन दिवसांत बांगलादेशचा दौरा करण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात आयसीसीचे प्रतिनिधी आणि बीसीबी अधिकारी वर्ल्ड कपच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करू शकतात.

2026 च्या टी-20 वर्ल्ड कपला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. सध्याच्या वेळापत्रकानुसार, बांगलादेशचा पहिला सामना 7 फेब्रुवारीला वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकाता येथे होणार आहे. मात्र, सुरक्षेचे कारण पुढे करत बांगलादेशने वर्ल्ड कपसाठी भारत दौऱ्यावर येण्यास नकार दिला होता.

रिपोर्ट्सनुसार, आयसीसी आणि बीसीबी यांच्यात होणाऱ्या या बैठकीत बांगलादेशचा वर्ल्ड कपमधील सहभाग आणि त्यांच्या सामन्यांच्या ठिकाणांवरून (Venues) चर्चा होऊ शकते. सध्याच्या नियोजनानुसार बांगलादेशचे सामने कोलकाता आणि मुंबईत होणार आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपले सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली होती, परंतु आयसीसीने सध्या तरी ही मागणी फेटाळून लावली आहे.

गेल्या काही दिवसांपासून बांगलादेश सरकारचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल भारताच्या विरोधात चिथावणीखोर विधाने करत आहेत. त्यांनी बांगलादेशचे सामने पाकिस्तानमध्ये खेळवावेत असा प्रस्तावही मांडला होता. इतकेच नाही तर, आयसीसीने आमची मागणी मान्य केली असून भारतात बांगलादेशी खेळाडूंना धोका असल्याचे मान्य केले आहे, असा खोटा दावाही त्यांनी केला होता. मात्र, खुद्द बांगलादेश क्रिकेट बोर्डानेच अलीकडे एक प्रसिद्धीपत्रक काढून आयसीसीने अशी कोणतीही मंजुरी दिली नसल्याचे स्पष्ट करत हा दावा खोडून काढला. आता येत्या काही दिवसांत आयसीसीचे प्रतिनिधी बांगलादेशच्या अधिकाऱ्यांसोबत काय चर्चा करतात आणि या वादावर काय तोडगा निघतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---