ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup) बुधवारी (26 ऑक्टोबर) पुन्हा एकदा धक्कादायक निकाल पाहायला मिळाला आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळताना आयर्लंड पुरूष क्रिकेट संघाने इतिहास रचला. त्यांनी सुपर 12च्या सामन्यात इंग्लंडला डकवर्थ लुईसच्या नियमानुसार 5 धावांनी पराभूत केले. या पराभवाने इंग्लंडने मात्र एक विक्रम आपल्या नावे केला आहे तो म्हणजे त्यांना आतापर्यंत दोन संघांनी टी20 विश्वचषकात सामना कधीच जिंकूच दिला नाही.
इंग्लंडने 2010 मध्ये टी20 विश्वचषक जिंकला. यंदाच्या विश्वचषकात ते जरी फेव्हरेट नसले तरी त्यांना आयर्लंडविरुद्ध सामना गमवावा लागेल हा विचारदेखील कोणी केला नाही. तसे पाहिले तर पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी20मध्ये इंग्लंडला अद्याप युरोपीय संघाविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. त्यामध्ये आयर्लंडचा समावेश आता झाला आहे, मात्र आयर्लंडच्याआधी इंग्लंडला अजून एका संघाविरुद्ध टी20 विश्वचषकात एकही सामना जिंकता आलेला नाही.
त्या संघाचे नाव नेदरलॅंड्स. होय तोच नेदरलॅंड्स ज्याला यंदाच्या टी20 विश्वचषकाचा सुपर 12चा सामना बांगलादेशविरुद्ध अवघ्या 9 धावांनी गमवावा लागला. आता त्यांचा पुढील सामना 27 ऑक्टोबरला भारताशी आहे. त्याचबरोबर इंग्लंडने आयर्लंड आणि नेदरलॅंड्सविरुद्ध एकही टी20 सामना जिंकलेला नाही. England are yet to win against a European team in men’s T20Is
नेदरलॅंड्स आणि इंग्लंड पुरूष क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय टी20मध्ये आतापर्यंत दोन वेळा समारोसमोर आले आहेत. पहिल्यांदा हे दोन संघ 2009च्या टी20 विश्वचषकात भिडले. तेव्हा नेदरलॅंड्स 4 विकेट्सने जिंकला. 2014च्या विश्वचषकात ते दुसऱ्यांदा आमने-सामने आले, तेव्हाही नेदरलॅंड्सने बाजी मारली होती. त्या सामन्यात इंंग्लंड केवळ 88 धावसंख्येवर सर्वबाद झाला होता. तो सामना नेदरलॅंड्सने 45 धावांनी जिंकला होता. आता इंग्लंड आयर्लंडकडून पराभूत झाला. यामुळे इंंग्लंड या युरोपियन संघाकडून नेहमीच पराभूत होत झाला.
वेस्ट इंडिज टी20 विश्वचषकातून बाहेर झाल्याने जेवढे सगळ्यांना आश्चर्य वाटले तेवढेच आयर्लंडकडून पराभूत झालेल्या इंग्लंडच्या सामन्याने क्रिकेटप्रेमींना वाटले आहे.
आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना 19.2 षटकात सर्व विकेट्स गमावत 157 धावा केल्या. त्याच्या प्रत्युत्तरात 14.3 षटकात 5 विकेट्स गमावत 105 धावा केल्या. पाऊस इंग्लंडसाठी शत्रू ठरल्याने हा सामना त्यांनी डकवर्थ लुईसच्या नियमानुसार 5 धावांनी गमावला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इतिहास कायम राहिला! विश्वचषकात आयर्लंडविरुद्ध इंग्लंड नेहमीच होते टाय-टाय फिस्स
टी20 क्रमवारीत पहिल्या स्थानाकडे विराटची आगेकूच, सूर्या-बाबरला मागे टाकत नवा खेळाडू दुसऱ्या क्रमांकावर





