टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. 13 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट मैदानावर पार पडणार आहे. हा सामना इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याला सध्याच्या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणजेच मालिकावीर निवडले आहे. मात्र, पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याचा याबाबतीत विचार जरा वेगळा आहे.
इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) याने म्हटले की, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने मोकळेपणाने फटकेबाजी केली. स्टार खेळाडूंनी सजलेल्या फळीत त्याने स्वत:ची वेगळी जागा निर्माण केली. आयसीसी टी20 विश्वचषक 2022 (ICC T20 World Cup 2022) स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ( Player of the tournament) नावाची घोषणाही होईल.
बटलर म्हणाला की, “मला वाटते सूर्यकुमार यादव. माझ्यामते, सूर्यकुमार असा खेळाडू राहिला आहे, ज्याने जास्त मोकळेपणाने खेळ दाखवला. स्टार खेळाडूंनी सजलेल्या फळीत त्याने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. ज्याप्रकारे तो खेळला, ते शानदार आहे. त्याच यादीत आमचे काही खेळाडूही आहेत. सॅम करन आणि ऍलेक्स हेल्स. जर ते अंतिम सामन्यात शानदार कामगिरी करण्यास यशस्वी ठरले, तर ते माझ्यासाठी प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ठरू शकतात.”
Nine shortlisted candidates for the Player of the Tournament award 👀
Jos Buttler and Babar Azam make their picks 😯 #T20WorldCuphttps://t.co/CKJhG629KR
— ICC (@ICC) November 12, 2022
दुसरीकडे, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने या पुरस्कारासाठी आपल्या संघातील स्टार अष्टपैलू शादाब खान याची निवड केली आहे. त्याने स्पर्धेत 10 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 52 धावांची खेळीही साकारली होती.
बाबर म्हणाला की, “मला वाटते शादाब खान ज्याप्रकारे खेळत आहे, हा पुरस्कार त्यालाच मिळाला पाहिजे. त्याची गोलंदाजी शानदार राहिली आहे. त्याच्या फलंदाजीतही सुधारणा झाली पाहिजे. मागील तीन सामन्यात त्याच्या शानदार प्रदर्शनासोबत त्याच्या क्षेत्ररक्षणानेही त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा प्रमुख दावेदार बनवले आहे.”
आयसीसीने शुक्रवारी (दि. 11 नोव्हेंबर) अशा 9 खेळाडूंची यादी जारी केली आहे, जे प्लेअर ऑफ द टूर्नामेंट बनू शकतात. या यादीत विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना संधी मिळाली आहे. दुसरीकडे, पाकिस्तानच्या दोन खेळाडूंचाही (शादाब खान, शाहीन आफ्रिदी) यामध्ये समावेश आहे. याव्यतिरिक्त इंग्लंडच्या तीन (सॅम करन, जोस बटलर, ऍलेक्स हेल्स), तर झिम्बाब्वे (सिकंदर रझा) आणि श्रीलंका (वनिंदु हसरंगा) संघांच्या प्रत्येकी एक खेळाडूंना स्थान मिळाले आहे.
अशात स्पर्धेनंतर कळेल की, कोणत्या खेळाडूला मालिकावीर पुरस्कार मिळतो. (T20 World Cup Final Jos Buttler Chooses Suryakumar Yadav As His Man of the tournament babar wants this player to the award)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काय सांगता! एमएस धोनी करणार भाजपमध्ये प्रवेश? गृहमंत्री अमित शाहांसोबत केली हातमिळवणी
‘दुसऱ्याच्या दु:खात सुख शोधता तुम्ही…’, भारताच्या इरफानने पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर डागली तोफ, पण का?