ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. 15 सदस्यीय भारतीय संघामध्ये रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक या दोन अनुभवी खेळाडूंचा सहभाग आहे. या स्पर्धेत रोहित संघाचे नेतृत्व करणार आहे, तर कार्तिकला विकेटकीपर-फलंदाजाच्या रूपात घेतले आहे. हे दोघेही 2007मध्ये झालेल्या पहिल्या टी20 विश्वचषकाचा भाग राहिले आहेत. तर आयसीसीने कार्तिकचा एक व्हिडिओ शेयर केला आहे.
दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने भारताकडून मागील टी20 विश्वचषक 2010मध्ये खेळला होता. आता पुन्हा तो टी20 विश्वचषकाच्या संघाचा भाग बनला आहे. अशातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) त्याच्या एका अफलातून झेलचा व्हिडिओ शेयर केला आहे. हा झेल त्याने 15 वर्षापूर्वी घेतला होता.
कार्तिकने 2007च्या टी20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा त्यावेळेचा कर्णधार ग्रॅम स्मिथ (Graeme Smith) याचा चपळाईने झेल घेतला होता. कार्तिकने घेतलेला तो झेल त्या स्पर्धेतील उत्कृष्ठ झेल ठरला होता. आरपी सिंग (RP Singh) याने टाकलेल्या गोलंदाजीवर त्याने हवेत डाईव्ह मारत तो झेल घेतला. तो सामना भारताने 37 धावांनी जिंकला होता.
त्या विजेत्या टी20 विश्वचषक स्पर्धेत कार्तिकसोबत रोहितही खेळला होता. तर पुन्हा एकदा हे दोघे भारताकडून टी20 विश्वचषकात एकत्र खेळताना दिसणार आहे. यावेळी मात्र रोहित कर्णधाराच्या रूपात आहे.
https://www.instagram.com/reel/CicUmnCpGdi/?utm_source=ig_web_copy_link
कार्तिकची आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द
कार्तिकने 2006मध्ये भारताच्या टी20 संघात पदार्पण केले. त्याने पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 31 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. त्याने 15 वर्षात भारतासाठी फक्त 50 टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये 28.19च्या सरासरीने आणि 139.95च्या स्ट्राईक रेटने 592 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एकच अर्धशतक केले. हे अर्धशतक याचवर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केले आहे. त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या 55 आहे.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पीसीबीचा मोठा निर्णय! भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आफ्रिदीवर निलंबनाची कारवाई
वर्ल्डकपसाठी निवड झालेल्या संघातील या 5 जणांनी ऑस्ट्रेलियात ठेवलाही नाही पाय
शमी-सिराजला संघात का घेतले नाही? बड्या राजकीय नेत्याचा सवाल