माजी यूएफसी फायटर आणि किक-बॉक्सिंग जगतात स्पार्टन म्हणून ओळखला जाणारा इलियास थिओडोरू याचे निधन झाले. हा कॅनेडियन बॉक्सर फक्त 34 वर्षांचा होता. इलियास थिओडोरू याचे यकृताच्या कर्करोगाने निधन झाले. त्याच्यावर बराच काळ उपचार सुरू होते. तो यकृताच्या कर्करोगाच्या चौथ्या टप्प्याशी झुंज देत होता. केवळ काही निवडक लोकांना त्याच्या या गंभीर आजाराबद्दल माहिती होती.
In memory of Elias Theodorou. pic.twitter.com/2qojUOzJaG
— UFC (@ufc) September 12, 2022
थिओडोरू याचे 11 सप्टेंबर रोजी त्याच्या घरी निधन झाले. इलियास थिओडोरू याने शेवटचा श्वास घरातच कुटुंबासमोर घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली होती. थिओडोरूने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत 19 विजय मिळवले तर, 3 सामन्यांत त्याला पराभव पत्करावा लागला. त्याने आपल्या करिअरमधील आठ लढती नॉक आउट पद्धतीने जिंकल्या होत्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता धवन फक्त ‘बदली कर्णधार’ म्हणूनच संघात सामील होणार का?
रैना, इरफानने गायलेल्या गाण्यांवर युवीचा बेधुंद डान्स, हा व्हिडिओ नाही पाहिला तर काय पाहिले!
अर्शदीपच्या निवडीनंतर आईने दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “माझ्या मुलाने या वयात…”






