Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तब्बल 12 वर्षांचा वनवास अखेर संपला! दिनेश कार्तिकचे ‘ते’ स्वप्न साकार

तब्बल 12 वर्षांचा वनवास अखेर संपला! दिनेश कार्तिकचे 'ते' स्वप्न साकार

October 23, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Dinesh-Karthik

Photo Courtesy : Twitter/BCCI


टी20 विश्वचषकात (T20 World Cup) रविवारी (23 ऑक्टोबर) क्रिकेटविश्वातील हायव्होल्टेज सामना  भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला गेला. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी नाणेफेक तेव्हा भारताच्या बाजूने या नाणेफेकीचा कौल लागला आणि विकेटकीपर म्हणून भारताचा कर्णधार रोहित शर्मा कोणाला संघात घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. अखेर दिनेश कार्तिक याची संघात विकेटकीपर म्हणून निवड झाली आणि त्याचे 12 वर्षापासूनचे स्वप्न पूर्ण झाले.

दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने भारताच्या टी20 संघात 2006मध्ये पदार्पण केले. तो 2007च्या टी20 विश्वचषकासाठीही भारतीय संघात खेळला. तो 2010मध्ये भारतासाठी टी20 विश्वचषक खेळला. त्यानंतर त्याचे संघात आत-बाहेर सुरू होते. यामुळे त्याला नंतरच्या 2012, 2014, 2016 आणि 2021 अशा चार विश्वचषकांना मुकावे लागले. त्याने टी20 विश्वचषक 2022साठी स्वत:ची जागा तयार केली. 2022च्या आयपीएलमध्ये त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना चांगली कामगिरी केली. त्याने 16 सामन्यात 55च्या सरासरीने 330 धावा केल्या. त्याची ही आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी ठरली.

आयपीएलमध्ये केलेल्या या उत्तम कामगिरीने त्याने पुन्हा एकदा राष्ट्रीय संघाची निळी जर्सी मिळवली. त्याने आयपीएल 2022च्या सामन्यांमध्ये आणि भारताकडून फिनिशरची योग्य भुमिका पार पाडली. एकेकाळी एमएस धोनी याच्यामुळे त्याचे आंतरराष्ट्रीय कारकिर्द संपली अशी चर्चांना उधान आले होते. चोहोबाजूंनी असे बोलणे कानावर पडत असताना कार्तिकने त्याच्याकडे लक्ष न देता आपल्या कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न केला. त्याने एक फलंदाज नाही तर विकेटकीपर म्हणूनही भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये आपले स्थान पक्के केले.

पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात कार्तिकला फलंदाजीची संधी मिळाली. मात्र, त्याला त्याचा संधाची फायदा उचलता आला नाही. असे असले तरी, त्याने विकेटकीपिंग मात्र भन्नाट केली

Amazing stop by Dinesh Karthik. pic.twitter.com/2WvjuT6Xmb

— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 23, 2022

2006-2022च्या दरम्यान त्याने भारताकडून केवळ 57 सामने खेळले. यामध्ये त्याने 672 धावा केल्या. त्यात त्याने एकमेव अर्धशतके केले असून त्याने ही खेळी 2022ला राजकोटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केली होती.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एक हजारी हार्दिक पंड्या! आंतरराष्ट्रीय टी20मध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय
‘पिछली बार क्या बोला था?’, सोशल मीडियावर अर्शदीपच्या मिम्स व्हायरल


Next Post
Virat kohli v pak

"तर आपण हरलो असतो", स्वतः विराटने सांगितला थरारक सामन्याचा टर्निंग पॉइंट

Virat-Kohli-And-Rohit-Sharma

आनंदाचा क्षण! विजयानंतर रोहितने विराटला उचलले खांद्यावर, पंड्यालाही अश्रू अनावर

Team India in T20 WC 2022

सौरव गांगुलीची भविष्यवाणी! 'हे' संघ गाठणार टी20 विश्वचषकाची उपांत्यफेरी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143