Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टी20 विश्वचषकात ‘हे’ तीन संघ भारताला नेहमीच नडले, एक सुपर 12मध्ये गारद झाल्याने संकट टळले

टी20 विश्वचषकात 'हे' तीन संघ भारताला नेहमीच नडले, एक सुपर 12मध्ये गारद झाल्याने संकट टळले

October 22, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
team-india-2

Photo Courtesy: Twitter/BCCI


ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup) भारताचा पहिला सामना रविवारी (23 ऑक्टोबर) पाकिस्तानविरुद्ध आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. टी20 विश्वचषकाचा इतिहास पाहिला तर भारत पाकिस्तानविरुद्ध सर्वात यशस्वी ठरला आहे. मात्र तीन संघ असे आहेत ज्यांनी भारताला नेहमीच आव्हान दिले आहे. त्यातील एक संघ तर यंदाच्या सुपर 12च्या फेरीत पोहोचला देखील नाही. यामुळे भारताचे संकट थोडे टळले आहे. ते तीन संघ कोणते हे जाणून घेऊ.

भारताने 20007मध्ये टी20 विश्वचषक जिंकला. त्यानंतर भारताच्या हाती नेहमी अपयशच आले आहे. या स्पर्धेचा इतिहास पाहिला तर वेस्ट इंडिज भारतासाठी नेहमी आव्हानात्मक ठरला आहे. वेस्ट इंडिज 2022च्या विश्वचषकाच्या सुपर 12मध्ये पोहोचलाच नाही. त्यामुळे भारताचे टेंशन थोडेफार कमी झाले आहे. तसेच वेस्ट इंडिजला प्रथमच टी20 विश्वचषकाच्या सुपर 12चे तिकीट मिळाले नाही. या कॅरेबियन संघानंतर न्यूझीलंड आणि शेजारील देशाने भारताला सर्वाधिक त्रास दिला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 विश्वचषकात एकूण तीन सामने खेळले गेले. हे तिन्ही सामने न्यूझीलंडनेच जिंकले आहे. तसेच मागील काही आयसीसी स्पर्धा पाहिल्या तर न्यूझीलंडच भारतावर भारी पडला आहे. 2007च्या विश्वचषकातदेखील न्यूझीलंड 10 धावांनी विजयी ठरला होता. यामुळे भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्याकडे नवा विक्रम करण्याची संधी आहे.

न्यूझीलंड, वेस्ट इंडिजनंतर भारताला कोणी सर्वाधिक त्रास दिला असले तर 2014चा चॅम्पियन संघ. श्रीलंका आणि भारत हे टी20 विश्वचषकात आतापर्यंत दोन वेळा समोरासमोर आले. या दोन्ही सामन्यात श्रीलंकाच विजेता ठरला आहे. 2014 आणि 2010मध्ये हे सामने खेळले गेले.

त्याचबरोबर भारत-पाकिस्तान या दोन्ही संघात टी20 विश्वचषकात आतापर्यंत सहा सामने खेळले गेले. त्यातील पाच सामने भारताने जिंकले तर एक सामना गमावला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
याला म्हणतात सुरुवात! पहिल्याच सामन्यात ऍलनचा धमाका! फोडून काढली ऑस्ट्रेलियाची अनुभवी गोलंदाजी
‘राशिद खान असेल इंग्लंडसाठी सर्वात मोठा धोका’, माजी कर्णधाराने आधीच केले सावध


Next Post
NZ-vs-AUS

ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतक ठोकत न्यूझीलंडने टी20 विश्वचषकात रचला इतिहास, वाचा काय केलाय पराक्रम

Sachin Tendulkar, Virat Kohli

सचिनचा मोठा विक्रम तुटण्याच्या मार्गावर; विराट केवळ एक पाऊल मागे, एकदा वाचाच

Photo Courtesy: Twitter/ICC

कॉनवेने धरलाय यशाचा मार्ग! 92 धावांच्या लाजवाब खेळीने सोडलेय विराट-बाबरला मागे

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143