---Advertisement---

जमलंय बघा! विराट कोहलीने केली ‘पुष्पा’मधील सुपरहिट ऍक्शन, व्हिडिओ जोरदार व्हायरल

On: बुधवार, ऑक्टोबर 19, 2022 4:39 PM
Virat-Kohli
---Advertisement---

भारतीय सिनेमा आणि क्रिकेट यांचं खूप जुनं नातं आहे. प्रेमप्रकरण, लग्नापासून ते सिनेमातील डायलॉगपर्यंत क्रिकेट आणि सिनेमा हे एकमेकांशी संबंधित आहेत. अनेकदा सिनेमात एखाद्या खेळाडूचं नाव घेतल्याचं पाहायला मिळतं. तसंच, क्रिकेटपटूही सिनेमातील एखादा डायलॉग किंवा ऍक्शन करताना दिसतात. असेच काहीसे आता पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये तो साऊथच्या एका सिनेमातील डायलॉगची ऍक्शन करताना दिसत आहे.

खरं तर, बुधवारी (दि. 19 ऑक्टोबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात टी20 विश्वचषक 2022मधील सराव सामना खेळला जाणार होता. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द झाला. मात्र, मैदानावर भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याचा मजेशीर अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला. सोशल मीडियावर यादरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये विराट अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्या ‘पुष्पा’ (Pushpa) सिनेमातील प्रसिद्ध ऍक्शन करताना दिसला. विराटने या सिनेमातील प्रसिद्ध डायलॉग ‘मैं झुकेगा नहीं साला’ (Main Jhukega Nahi Saala) याची ऍक्शन केली. यावेळी विराटच्या हातात बॅटही होती आणि तो इतर कुणालातरी ही ऍक्शन करून दाखवत होता.

https://twitter.com/iam_tiwari/status/1582230625821786112

‘या’ क्रिकेटपटूंनीही केलीय पुष्पाची ऍक्शन
‘पुष्पा’ सिनेमाची क्रेझ क्रिकेटपटूंवर अजूनही आहे. मागील आयपीएल हंगामात ऑस्ट्रेलियाचा दमदार फलंदाज डेविड वॉर्नर (David Warner), अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान (Rashid Khan), भारतीय सलामीवीर फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनीही या सिनेमातील गाण्यांवर आणि डायलॉगवर आपला अभिनय सादर करून दाखवला होता. वॉर्नरने सातत्याने अल्लू अर्जुनच्या या सिनेमावरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यामुळे प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेमही दिले होते.

भारतीय संघाचा पहिला सामना
भारतीय संघाचा पहिला सराव सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाला होता. या सामन्यात भारताने शेवटच्या षटकात 6 धावांनी विजय मिळवला होता. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने शेवटच्या षटकात 3 विकेट्स घेत संघाला विजय मिळवून दिला होता. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध होणारा सामना पावसामुळे रद्द झाला. आता भारताचा टी20 विश्वचषकातील पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. सुपर 12 फेरीतील हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये खेळला जाईल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुख, दर्द, पीडा! विश्वचषक खेळण्यासाठी सोडली मोठी ऑफर, पाकिस्तान संघातूनही सानियाचा पती बाहेर
भारत- पाकिस्तान सामन्यात ‘या’ 5 गोष्टींवर असेल आख्ख्या जगाचं लक्ष, जाणून घ्या एका क्लिकवर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---