रविवारी (दि. 13 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट मैदानावर टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात खेळला जाणार आहे. यापूर्वी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तान संघाने न्यूझीलंड संघाला पराभूत केले होते, तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघाचा एकतर्फी पराभव केला होता. यानंतर क्रिकेट विश्वातून या दोन्ही संघांवर अंतिम सामन्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशात इंग्लंड संघासाठी खेळलेला अष्टपैलू रवी बोपारा याने एका ट्वीटमध्ये सांगितले होते की, पाकिस्तान हा असा संघ आहे, जो इंग्लंड संघाला अंतिम सामन्यात टक्कर देऊ शकतो. याव्यतिरिक्त दुसरा कोणताच संघ नाहीये. यावर आता आयर्लंड संघाने रवी बोपाराला दिलेले प्रत्युत्तर चर्चेत आहे.
अशात आयर्लंड संघाच्या ट्विटर अकाऊंटने एक मेजशीर रिप्लाय दिला आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाविरुद्ध इंग्लंड संघाने मिळवलेल्या विजयानंतर रवी बोपारा (Ravi Bopara) याने ट्वीट करत लिहिले होते की, “इंग्लंड संघाने शानदार आणि जबरदस्त शक्ती प्रदर्शन केले. केवळ एक संघ आहे, जो इंग्लंडला आव्हान देऊ शकतो. तसेच, तो संघ आहे पाकिस्तान. नाहीतर, जर इंग्लंड 2022 टी20 विश्वचषकात दुसऱ्या प्लेईंग इलेव्हनसह प्रवेश करू शकतो, तर अंतिम सामन्यात इंग्लंड विरुद्ध इंग्लंड- 2 XI चा सामना झाला असता.”
Great performance and display of power and ruthlessness from England. There’s only one team that can actually challenge England and that is Pakistan. Otherwise If England could enter a 2ndXI in the #T20Iworldcup2022 it would be a England v England2XI Final. #fact #milesahead
— Ravi Bopara (@ravibopara) November 11, 2022
रवी बोपाराच्या या ट्वीटवर आयर्लंड क्रिकेट बोर्डाच्या ट्विटर हँडलने फक्त दोन शब्द लिहिले आणि म्हटले की, “<clears throat>.” म्हणजेच आपला गळा साफ ठेवा.
<clears throat>
— Cricket Ireland (@cricketireland) November 12, 2022
आयर्लंडने लिहिलेल्या दोन शब्दांचा थेट अर्थ असा होतो की, साखळी सामन्यांमध्ये आयर्लंडने इंग्लंड संघाला डकवर्थ लुईस नियमानुसार 5 धावांनी पराभूत केले होते. तसेच, त्यांना रवी बोपाराला आठवण करून द्यायची आहे की, पाकिस्तान हा एकमेव संघ नाहीये, जो इंग्लंडला टक्कर देईल. खरं तर, आयर्लंडने इंग्लंडला मात दिली होती. आयर्लंड क्रिकेटच्या या प्रत्युत्तराला क्रिकेट प्रेमींना जबरदस्त उत्तर म्हटले आहे.
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघातील अंतिम सामन्याला 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.30 वाजता मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये सुरुवात होईल. (T20 world cup ireland cricket hilarious reply england cricketer ravi bopara see here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जरा इकडे पाहा! इंग्लंडचा गोलंदाज झालाय फिट, पाकिस्तानला करणार सळो की पळो? व्हिडिओ व्हायरल
भारताला हरवणाऱ्या बटलरने सूर्यकुमारला निवडले ‘मालिकावीर’, पण बाबरला वाटतं ‘हा’ खेळाडू जिंकणार पुरस्कार