आशिया चषक 2022 स्पर्धा ऑगस्ट महिन्यात पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला कडवी झुंज दिली. मात्र, त्यांना विजय मिळवता आला नाही. त्यानंतर न्यूझीलंडमध्ये तिरंगी मालिकेत पाकिस्तानने विजय मिळवला. या विजयानंतर पाकिस्तान संघाला टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, आता बाबर आझम याच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघ स्पर्धेतून बाहेर जाण्याच्या मार्गावर आहे. गुरुवारी (दि. 27 ऑक्टोबर) झिम्बाब्वे संघाने पाकिस्तानला 1 धावेने पराभूत केले. मात्र, या सामन्याच्या शेवटच्या षटकात पाकिस्तानी खेळाडूने नियमांचे उल्लंघन केले. तरीही त्यांना विजय मिळवता आला नाही.
या सामन्यात झिम्बाब्वे संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांचा फलंदाज शॉन विलियम्स याने सर्वाधिक 31 धावांच्या जोरावर झिम्बाब्वेला 8 विकेट्सच्या नुकसानावर 130 धावांपर्यंत पोहोचवले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तान संघाला 8 विकेट्स गमावत 129 धावाच करता आल्या. शेवटच्या षटकात मिळालेल्या लाजीरवाण्या पराभवापासून वाचण्यासाठी नियम धूळीस मिळवले, पण तरीही त्यांच्या पारड्यात विजय पडलाच नाही.
https://twitter.com/ZimCricketv/status/1585655967487762435
मंकडींगने बाद झाला असता पाकिस्तान फलंदाज
झालं असं की, पाकिस्तानला सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 3 धावांची आवश्यकता होती. 2 धावा केल्या असत्या, तर सामना बरोबरीत सुटला असता, त्यानंतर निर्णयासाठी सुपर ओव्हर खेळवावी लागली असती. शेवटच्या षटकाची जबाबदारी सांभाळणाऱ्या ब्रॅड इव्हान्स हा जेव्हा चेंडू टाकण्यासाठी धाव घेत होता, तेव्हा गोलंदाजी एंडला असलेला मोहम्मद वसीम ज्युनिअर (Mohammad Wasim Jr) एक धाव घेण्याच्या प्रयत्नात चेंडू फेकण्यापूर्वीच क्रीझच्या बाहेर पडला होता. इव्हान्स त्याला चेंडू टाकतानाच मंकडींग धावबाद करू शकला असता. आयसीसीच्या नवीन नियमांनुसार, नॉन स्ट्रायकर एंडवर होणारे मंकडींग आता धावबाद या नियमांतर्गत आला आहे.
तरीही पाकिस्तानचा पराभव
ट्विटरवर आता या घटनेचे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत. चाहते मोहम्मद वसीम ज्युनिअर याच्यावर जोरदार टीका करत आहेत. मात्र, या घटनेमुळे सामन्याच्या निकालावर कोणताही परिणाम झाला नाही. कारण, सामनावीर ठरलेल्या सिकंदर रझा याने चपळतेने चेंडू यष्टीरक्षकाकडे फेकला, ज्यामुळे शाहीन आफ्रिदी धावबाद झाला आणि पाकिस्तानला लाजीरवाणा पराभव सहन करावा लागला.
पाकिस्तानच्या पुढील सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर त्यांचा सामना 30 ऑक्टोबर रोजी पर्थ येथे नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या विस्फोटक फलंदाजाच्या यशामागील गुपीत काय? खुलासा करत म्हणाला, ‘आता मला कसली भीती’
विराट कोहलीला मागे टाकत एका अनोख्या रेकॉर्डचा रझा झाला ‘सिकंदर’






