यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकाची (ICC T20 World Cup) सुरुवात रविवारी (2 जून) रोजी झाली. यंदाचा टी20 विश्वचषक अमेरिका (America) आणि वेस्ट इंडीज (West Indies) या दोन देशात खेळला जात आहे. तत्पूर्वी पाकिस्तान संघ या विश्वचषकातील अद्याप एकही सामना खेळला नाही. पाकिस्तान संघ गुरुवारी (6 जून) रोजी अमेरिकाविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. परंतु पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं माहिती दिली आहे की, पहिल्या सामन्यात फिरकीपटू इमाद वसीम नसणार आहे.
पाकिस्तानं क्रिकेट बोर्डानं सांगितले की, “गुरुवारी पहिल्याच सामन्यादिवशी इमाद वसीम (Imad Wasim) नसणार आहे. कारण पाकिस्तान मेडीकल टीमनं त्याला विश्रांती घ्यायला सांगितले आहे.”
मे माहिन्यात इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या चौथ्या टी20 सामन्यापूर्वी वसीमला उजव्या पायाला दुखापत झाली होती. (30 मे) रोजी इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान खेळल्या गेलेल्या सामन्यात वसीम सहभागी नव्हता. पाकिसान संघानं खात्री केली आहे डाव्या हाताचा फिरकीपटू इमाद वसीम (Imad Wasim) (9 जून) रोजी भारताविरुद्धच्या सामन्यात उपलब्ध असेल. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना न्यूयाॅर्कमध्ये असलेल्या नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
इमाद वसीमनं यंदाच्या टी20 विश्वचषकापूर्वी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय मागे घेतला होता. वसीमन शेवटचा टी20 विश्वचषक 2021 मध्ये खेळला होता. या 35 वर्षीय खेळाडूनं पाकिस्तान सुपर लीगमध्ये फायनल सामन्यात 5 विकेट्स घेत संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानं पाकिस्तान सुपर लीगमध्ये राष्ट्रीय संघाच्या निवडकर्त्यांचं लक्ष्य वेधून घेतलं होतं. त्यामुळे यंदाच्या टी20 विश्वचषकात पाकिस्तान संघाला इमाद वसीमकडून योगदानाची अपेक्षा असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शर्माकडे इतिहास रचण्याची संधी, धोनीला मागे टाकून बनेल भारताचा नंबर-1 कर्णधार
शिवम दुबेची तुलना चक्क कपिल देव यांच्याशी! सीएसकेच्या कोचचं धक्कादायक वक्तव्य
आयपीएल 2025 पूर्वी मार्कस स्टॉइनिसचे ‘सुपर किंग्ज’मध्ये आगमन!