---Advertisement---

T20WC: सचिनने उलगडले ऑस्ट्रेलियाच्या मैदानांचे ‘रहस्य’! ज्याने घेतले मनावर तोच होणार विनर

On: गुरूवार, ऑक्टोबर 20, 2022 5:09 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियामध्ये टी20 विश्वचषक (T20 World Cup) सुरू आहे. येथील मैदाने वेगवान गोलंदाजांसाठी पूरक असल्याचे अनेकदा दिसले आहे. यावरून गोलंदाजांची जमेची बाजू समजली आहे. तर फलंदाजांसाठी कोणत्या गोष्टी लाभदायक ठरतील याबाबतही जाणून घेऊ. यावेळी क्रिकेटविश्वातील दिग्गज सचिन तेंडुलकर चर्चेत सहभागी झाला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या भुमीवर कोणती बाब महत्वाची याचे रहस्य सांगितले आहे. तसेच सचिनचे म्हणणे ज्याने मानले त्याला ऑस्ट्रेलियात मदत होणार आहे.

फलंदाजांसाठी महत्वाच्या गोष्टी
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने एका वृत्तसंस्थेसाठी कॉलम लिहिला. त्यामध्ये त्याने लिहिले, ‘ऑस्ट्रेलियामध्ये ड्राय-इन पिच आणि बाजूला अधिक गवत असलेल्या खेळपट्ट्या आहेत. यावेळी फलंदाजांनी बॅट ग्राउंडला घासणे अधिक लाभदायक ठरते. ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्यांवर शॉट खेळणे अवघड असते. त्यामुळे बॅट जमिनीला टेकवूनच खेळावे. यामध्ये बॅटची पुढची बाजू जमिनीला घासली तर अधिक चांगले.’

स्पाईक्सवर अधिक लक्ष द्या
सचिनने त्याच्या कॉलमध्ये स्पाईक्सबाबतही लिहिले आहे. ऑस्ट्रेलियाची खेळपट्टी पाहता खेळाडूंचा बुटाला स्पाईक्स असणे आवश्यक आहे. फलंदाजी करायला जातो तेव्हा खेळाडूला जलदगतीने धावण्यास त्याची मदत होते. क्षेत्ररक्षण करताना छोटे स्पाईक्स असले तरी चालते, मात्र फलंदाजी करताना स्प्रिंटरवाले स्पाईक्स नक्की वापरा. असा सल्लाही सचिनने त्याच्या कॉलमधून दिला आहे.

स्ट्राईकवर असलेल्या खेळाडूने कोणत्या दिशेला पळावे
आता फलंदाजाने कोणत्या बाजूला पळावे हा पण एक प्रश्न आहे. याचे उत्तर देताना तो म्हणाला, ड्रॉप इन खेळपट्ट्यांवर कॉर्नरच्या दिशेने पळणे योग्य. समजा डाव्या हाताचा गोलंदाज गोलंदाजी करत असेल दुसरीकडच्या फलंदाजाने बाजूला थांबावे आणि त्यामुळे स्ट्राईकवर असलेला फलंदाज आतमध्ये पळू शकेल. यामुळे रनिंग बिटवीन विकेट म्हणजे एकेरी-दुहेरी धावा काढणे सोपे होते. त्यासाठी दोन्ही फलंदाजांमध्ये आधीच चर्चा झाली पाहिजे.

सचिनने हा कॉलम द इंडियन एक्सप्रेससाठी लिहिला. एकंदरीत केवळ चौकार-षटकारांनी नाही तर एकेरी-दुहेरी धावा घेण्यानेही सामना जिंकला जाऊ शकतो. यामुळे या आठव्या टी20 विश्वचषकात गतविजेता संघ पुन्हा विजेता की 15 वर्षानंतर भारत जिंकणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘बाकीचे खेळाडू काय छोले विकायला गेले होते का?’, विश्वचषकाच्या प्रश्नावर भडकला पाकिस्तानी दिग्गज
पुणेकर ऋतुराज धोनीकडून शिकला विकेटकीपिंग! शानदार स्टंपिंग करत सॅमसनला दाखवला तंबूचा रस्ता

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---