आयसीसी टी20 विश्वचषकाची स्पर्धा रोमांचक सुरु आहे. यंदाचा टी20 विश्वचषक अमेरिका (America) आणि वेस्ट इंडीज (West Indies) या दोन देशात खेळला जात आहे. (2 जून) रोजी सुरु झालेल्या टी20 विश्वचषकातील आज (6 मे) रोजी इग्लंड विरुद्ध स्काॅटलंड सहावा सामना आहे. स्काॅटलंडनं टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
इग्लंड (England) विरुद्ध स्काॅटलंड (Scotland) केन्सिंग्टन ओवल, ब्रिजटाउन, बार्बाडोस या मैदानावर हा सामना रंगणार आहे. इंग्लंडची धुरा जोस बटलर (Jos Buttler) सांभाळताना दिसेल तर स्काॅटलँडची धुरा रिची बेरिंग्टन (Richie Berrington) सांभाळताना दिसणार आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
इंग्लंड- जोस बटलर (कर्णधार/यष्टीरक्षक), फिलिप सॉल्ट, विल जॅक्स, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियम लिविंगस्टन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड
स्काॅटलंड- जॉर्ज मुन्से, मायकेल जोन्स, ब्रँडन मॅकमुलेन, रिची बेरिंग्टन (कर्णधार), मॅथ्यू क्रॉस (यष्टीरक्षक), मायकल लीस्क, ख्रिस ग्रीव्ह्ज, मार्क वॉट, क्रिस्टोफर सोल, ब्रॅड व्हील, ब्रॅडली करी
2010 आणि 2022 ला आंतरराष्ट्रीय टी20 विश्वचषकावर नाव कोरलेल्या इंग्लड (England) संघासमोर आ ज स्काॅटलंड (Scotland) संघाचं आव्हान आहे. दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचं झालं तर इंग्लंड आणि स्काॅटलंड दोन्ही संघ याआधी टी20 क्रिकेटमध्ये आमनेसामने आले नाहीत. टी20 क्रिकेटमध्ये दोन्ही संघ प्रथमच एकमेकांविरुद्ध भिडत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट कोहलीनं सलामीला यावं की नाही? माजी खेळाडूनं दिली प्रतिक्रिया
युसूफ पठाणचे निवडणुकीच्या मैदानावर वर्चस्व! पाच वेळेच्या विद्दमान खासदारला चारली धूळ
भारतीय संघाची ट्रॉफीपेक्षा ‘या गोष्टीवर’ जास्त भर! राहुल द्रविडने केली खुलासा